Home | Maharashtra | Pune | Couple Attempt to Suicide by jumping in Canal Sarasbaag Pune

पुण्यातील सारसबागमधल्या कॅनॉलमध्ये दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; लक्ष्मीपूजनानंतर घेतली उडी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2018, 12:15 PM IST

प्रदीप आणि कांचनमध्ये वाद सुरु असल्याचे समजते. आधी कांचन हिने कॅनॉलमध्ये उडी घेतली.

  • Couple Attempt to Suicide by jumping in Canal Sarasbaag Pune

    पुणे- सारसबाग येथील विपश्यना केंद्र कॅनॉलमध्ये एका दाम्पत्याने उडी घेऊन आत्महत्येाचा प्रयत्न केला. प्रदीप शेंडगे आणि कांचन शेंडगे असे या दाम्पत्याचे नाव आहे. बुधवारी (7 नोव्हेंबर) लक्ष्मीपूजनानंतर रात्री अकरा वाजता दोघांनी कॅनॉलमध्ये उडी घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या जोडप्याला सुखरुप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

    प्रदीप आणि कांचनमध्ये वाद सुरु असल्याचे समजते. आधी कांचन हिने कॅनॉलमध्ये उडी घेतली. त्यापाठोपाठ प्रदीपने उडी घेतली. दोघे कॅनॉलमध्ये एका झाडाला धरुन असल्याचे दिसले. कॅनॉलमध्ये पाण्याचा प्रवाह जास्त होता. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या साहाय्याने या दाम्पत्याला सुखरुप बाहेर काढले. याप्रकरणी पुणे पोलिस पुढील तपास करत आहेत.

Trending