आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावळेश्वरच्या कोंबडयाला लागला दुचाकीवर बसून फिरण्याचा लळा..मोहोळसह परिसरात एकच चर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पापरी- दुचाकीवर बसून फिरणारऱ्या सावळेश्वर येथील एका कोंबडयाची मोहोळसह परिसरात चांगलीच क्रेझ आहे. औदुंम्बर लवटे यांचा हा कोंबडा आहे. सध्या मोहोळ शहरात व तालुक्यात नागरिकांत आता कुतुहुलाचा विषय बनला आहे. लवटे हे चिंचोली एमआयडीसीत प्रीसीजन कंपनीत कार्यरत आहेत.

 

लवटे यांना कोंबड्या, ससे पाळण्याचा छंद आहे. लवटे यांनी काही वर्षापूर्वी ससेपालन केले होते. मात्र, कामाच्या व्यापामुळे त्याकडे त्यांना फारसे लक्ष देता आले नाही. आता लवटे यांच्याडे दोन कोंबडे आहेत. एके दिवशी कोंबड्याला गाडीवर बसवले तो थोडा घाबरला. मात्र, सतत प्रयत्न करुन त्यांनी त्याला  गाडीवर बसायला शिकविले. कोंबडयाची भीती गेली. त्याला आता गाडीवर बसायची सवय लागली आहे. आता तर कोंबड्याला गाडीवरील प्रवासाचा आनंद मिळतोय. औदुंबर गाडीला चावी लावयच्या आधीच कोंबडा गाडीवर चढून बसतो आहे. कोंबड्याला बसण्यासाठी गाडीच्या हॅंण्डलवर एक स्टॅण्ड बनवले आहे. स्टॅन्डवर कोंबडा अगदी आरामात बसतो.

 

लवटे हे मोहोळला बाजारला येताना तसेच सोलापूरला काही कामानिमित्त जाताना कोंबड्याला सोबत घेऊन जातात. कोंबडा 50 च्या स्पीडवर जराही डगमगत नाही. औंदुंबर यांची कोंबडा बसलेली दुचाकी जिथे जाईल तिथे लोक, युवकवर्ग जमा होतात. कोंबड्यासोबत ते सेल्फी घेतात. सावळेश्वर, मोहोळ शहर व तालुक्यातील आसपासच्या परिसरात या गाडीवर बसणाऱ्या कोंबड्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... दुचाकीवर बसून फिरणाऱ्या सावळेश्वरच्या कोंबडयाचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...