आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करणारी हसीन जहांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर गंभीर आरोप करून चर्चेत आलेली त्याची पत्नी हसीन जहां हिने आता राजकारणात एन्ट्री केली आहे. हसीन जहां हिने काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत हसीन जहां हिने काँग्रेसचा 'हात' पकडला.

 

हसीन जहां हिने पती मोहम्मद शमीवर कौटुंबिक हिंसाचार, अफेअर ते मॅच फिक्सिंगपर्यंत आरोप केले होते.

 

शमीचे पाकिस्तानी तरुणीसोबत अफेअर..?
शमीचे एका पाकिस्तानी तरुणीसोबत अफेअर सुरु असल्याचा धक्कादायक आरोप हसीन हिने केला होता. एवढेच नाही तर शमीला ती पैसे देते. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र, मॅच फिक्सिंगच्या आरोपात बीसीसीआयने शमीला क्लिनचिट दिली आहे.

 

कोण आहे हसीन जहां?

एक प्रोफेशनल मॉडल आणि कोलकाता नाइट राइडर्सची माजी चीअरलीडर, हसीन जहां हिने 2014 मध्ये शमीशी लग्न केले होते. लग्नानंतर तिने मॉडलिंग सोडले होते. कोलकाता येथील राहाणारी हसीन आणि शमीला एक मुलगी आहे. तिचे नाव आयरा असे आहे.

 

शमीसाठी तिने आपले करिअर सोडले. परंतु शमीला त्याचे काही घेणे देणे नाही. पुन्हा प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळविण्यासाठी परिश्रम घेत असल्याचे हसीन जहां हिने सांग‍ितले आहे.

बातम्या आणखी आहेत...