आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनर किलिंग..तेलंगणामध्ये सासर्‍याने एक कोटी रुपयांत दिली दलित जावयाच्या हत्येची सुपारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद/समस्तीपूर- तेलंगणामधील नालगोंडामध्ये गेल्या आठवड्यात गरोदर महिलेसमोर तिच्या इंजिनिअर पतीची हत्या करण्‍यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. तलवारी‍ने हल्ला करणारा सुभाष शर्मा याला बिहारमधील समस्तीपूर येथून अटक केली आहे. त्याच्या विरोधात अनेक राज्यात गुन्हे दाखल आहेत.

 

पोलिसांनी सांगितले की, मुलीने दलित तरुणासोबत प्रेमविवाह केल्यामुळे नाराज वडिलांनी जावयाची हत्या करण्यासाठी एका टोळक्याला एक कोटी रुपयांची सुपारी दिली होती.

 

मृत प्रणयने 6 महिन्यांपूर्वीच सवर्ण जातीच्या अमरुथाशी लग्न केले होते. यामुळे अमरुथाचे कुटुंबीय नाराज होते. सध्या पोलिसांनी अमरुथाचे वडील मारुती राव, भाऊ श्रवण कुमार यांच्यासोबतच आणखी तीन जणांना अटक केली आहे.

 

सीसीटीव्हीत कैद झाला Murder
3 दिवसांपूर्वीच मृत प्रणय जेव्हा आपल्या प्रेग्नेंट पत्नीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता, तेव्हाही त्याच्यावर पाठीमागून एकाने हल्ला केला होता. यानंतर प्रणय जमिनीवर पडला आणि त्याची पत्नी अमरुथाने लोकांना मदतीसाठी आरडाओरड सुरू केली होती. परंतु तोपर्यंत प्रणयचा मृत्यू झाला होता. अमरुथाने आपल्या जबाबात तिच्या वडिलांवर हॉनर किलिंगचा संशय व्यक्त केला होता. पोलिस चौकशीत कळले की, सासऱ्याने आपल्या जावयाच्या हत्येसाठी सुपारी किलरला 10 लाख रुपये दिले होते. अटक झाल्यानंतर तरुणीच्या वडिलांनी पोलिसांना म्हटले की, त्यांना या हत्येचा जराही पश्चात्ताप नाही. त्याने पोलिसांना म्हटले की, त्यांच्यासाठी मुलीपेक्षा त्यांची इज्जत जास्त महत्त्वाची आहे.

 

सासू-सासऱ्यासोबत राहणार अमरुथा
तीन महिन्यांची प्रेग्नेंट अमरुथा म्हणाली की, ती आपल्या पतीच्या हत्येनंतर आता कधीही आपल्या वडिलांच्या घरी जाणार नाही. अमरुथा म्हणाली की, आता उर्वरित आयुष्य ती सासू-सासऱ्यासोबत राहणार आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. घटनेचा VIDEO...

बातम्या आणखी आहेत...