आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या लोकलमध्ये चढताना सॉफ्टवेअर इंजिनिअरने गमावला स्वत:चा जीव, Video आला समोर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आयबीएम कंपनीत जॉब करणार्‍या सॉफ्टवेअर इंजिनिअरला दादर स्टेशनवर धावत्या लोकलमध्ये चढताना जीव गवमावा लागला. सुदर्शन चौधरी (31) असे या तरुणाचे नाव असून तो नागपूर येथील रहिवासी होता. विशेष म्हणजे तो एकुलता एक होता. रविवारी रात्री घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

 
पो‍लिसांनी दिलेली माहिती अशी की,  प्लेटफार्मवरुन लोकल निघाली होती. तिने वेगही घेतला होता. तितक्यात सुदर्शनने धावत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा पाय घसरला आणि तो लोकलसोबत 50 मीटर फरफटत गेला. त्याचा जागेवरच मृत्यू झाला. प्लेटफार्मवर सुदर्शनचा मोबाइल सापडला. त्यावरून त्याची ओळख पटली.

 

सुदर्शनचा मित्र संदीपने सांगितले की, त्याचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत. सुदर्शन हा मालाड परिसरात एका घरात पेईंग गेस्टम्हणून राहात होता.

बातम्या आणखी आहेत...