आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी.. वाचा कसे असते पंतप्रधानांचे सुरक्षा कवच!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचा धमकी देणारा ईमेल दिल्ली पोलिस आयुक्तांना प्राप्त झाला आहे. 'नोव्हेंबर 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांना ठार करु', असे ईमेलमध्ये म्हटले आहे. अज्ञात व्यक्तीने हा ईमेल पाठवला आहे. गुप्तचर यंत्रणांनी यासंदर्भात माहिती दिली.

 

पंतप्रधानांना धमकी देणारा ईमेल ईशान्य भारतातील राज्यांमधून आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, ईमेल नेमका कोणी पाठवला आहे, यासंदर्भात अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही. या अनुषंगाने आम्ही आपल्यासाठी देशाच्या पंतप्रधानांचे सुरक्षा कवच कसे असते, याबाबत माहिती घेऊन आलो आहे.

 

असे असते पंतप्रधानांचे सुरक्षा कवच...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील सर्वात आधुनिक आणि चोख सुरक्षा पुरविली जाते. नरेंद्र मोदींच्या आजूबाजुला सुरक्षेचा एक अभेद किल्ला 24 तास सज्ज असतो. सुरक्षेतील पहिले वलय हे एसपीजी जवानांचे असते. पंतप्रधान देशात असो अथवा विदेशात एसपीजी जवाना हे त्यांच्या कायम सुरक्षेत‍ तैनात असतात. एसपीजी जवानांकडे अत्याधुनिक पी-90 ऑटोमेटेड गन असते. तसेच सूटच्या आत एसपीजी जवानांनी बुलेटप्रूफ जॅकेट परिधान केलेले असते.

 

काळा चश्मा ते काळी ब्रीफकेस आहे खास
पंतप्रधानांच्या सुरक्षा कवचमध्ये दुसरे वलय असते ते एसपीजीच्या स्पेशल कमांडोंचे. पंतप्रधानांच्या प्रत्येक हलचालीवर तसेच संशयित व्यक्तीवर या कमांडोंचे लक्ष असते. कंट्रोल रूमशी प्रत्येक कमांडो संपर्कात असतो. एसपीजीच्या प्रत्येक कमांडोच्या डोळ्यावर काळा चश्मा असतो आणि एका कमांडोच्या हातात एक काळी ब्रीफकेस असते. दरम्यान, हे ब्रीफकेस म्हणजे पोर्टेबल बुलेटप्रूफ शील्ड असते. ती पूर्णपणे उघडते. पंतप्रधान संकंटात सापडले असता, कमांडोज बुलेटप्रुफ शील्ड उघडतात आणि त्यांना संरक्षण देतात.

 

सिक्युरिटी क्लियरन्सनंतर निश्चित होतो पंतप्रधानांचा दौरा..
पंतप्रधानांचा दौरा निश्चित करण्‍यापूर्वी एसपीजीचे कमांडोचे एक पथक त्या ठिकाणी जाते. सिक्युरिटी क्लियरन्सनंतर पंतप्रधानांचा दौरा निश्चित करण्‍यात येते.

 

अत्याधुनिक असते पंतप्रधानांची कार..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  BMW कार देण्यात आली आहे. ही कार बुलेटप्रुफ असून आग, पाणी, दारुगोळा आणि सुरुंग निरोधक आहे. एवढेच नाही तर गॅस अटॅकचाही कोणताही परिणाम या कारवर होत नाही. कारमध्ये सेल्फ सीलिंग फ्यूल टँक आहे. या यंत्रणेमुळे कारचा स्फोट होत नाही. कारचे काच देखील बुलेटप्रूफ आहेत. बॅक-अपसाठी कारमध्ये ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असते.

बातम्या आणखी आहेत...