आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मा पाटलांच्या मुलाचे टॉवरवर चढून आंदोलन, जमिनीचा मोबदला द्या, अन्यथा मुख्यमंत्री राजीनामा द्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंत्रालयात विषप्राशन करून धर्मा पाटील यांनी जीवन संपविले होते.

धुळे-  विखरण (ता. शिंदखेडा) येथील औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी जमीन संपादित झाली. मात्र, त्यानंतर अपेक्षित मोबदला न मिळाल्यामुळे मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र याने शुक्रवारी विखरण गावातील मोबाइल टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. दुपारी 12 वाजेपासून टॉवरवर चढून बसलेल्या नरेंद्र यांच्याशी पोलिस, महसूल प्रशासनातील यंत्रणा माइकवरून संवाद साधत होते. मात्र, सायंकाळपर्यंत नरेंद्र यांना उतरवण्यात यश आले नाही.

 

धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर योग्य मोबदला देण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते. त्याची पूर्तता न झाल्याने शुक्रवारी नरेंद्र पाटील याने टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत नरेंद्र आपल्या मागण्यांवर ठाम होते. कोणी टॉवरवर चढण्याचा प्रयत्न केला तर आपण वरून उडी मारू, असा इशाराही दिला.

 

या आहेत नरेंद्र यांच्या मागण्या
दोषींवर कारवाईचे आश्वासन देणारे आणि या प्रकरणात मध्यस्थी करणारे मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा. हे मंत्री जर स्वत:ची नैतिक जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवत असतील तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नरेंद्र यांनी केला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...