आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहीत आहे काय जज आणि मजिस्ट्रेटमधील फरक? दोन्ही शब्दांमध्ये मोठा डिफरन्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क- बहुतांश लोकांना जज आणि मजिस्ट्रेटमधील फरक माहीत नसतो. जज (न्यायाधीश) आणि मजिस्ट्रेट (दंडाधिकारी) हे दोन्ही शब्द तसेच पदांमध्ये मोठा फरक आहे. आज आम्ही आपल्याला जज आणि मॅजिस्ट्रेटमध्ये नेमका काय फरक असतो, हे सांगणार आहोत. कॉम्पीटिटिव्ह एग्झाम्सची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना या माहितीचा फायदा होईल.

 

दीवानी..

सिव्हिल अर्थात व्यवहारिक खटले. उर्दू भाषेत 'दीवानी' खटले असे संबोधले जाते. 

 

‍फौजदारी..
फौजदारी (क्रिमिनल) खटले. उर्दूत याला फौजदारी खटले असे संबोधले जाते.

 

कोणते खटले कोणत्या कोर्टात जातात..?
- हक्क, नुकसानाशी संबंधित खटले सिव्हिल अर्थात दीवानी कोर्टात जातात. या खटल्यांचा उल्लेख सीपीसी 1908 च्या सेक्शन 9 मध्ये केला जातो.
- गुन्हेगारी तसेच दंडात्मक कारवाईचे प्रावधान असलेले खटले हे फौजदारी कोर्टात दाखल केले जातात.

 

हा आहे जज आणि मजिस्ट्रेटमधील फरक
- समजा, तुमच्या घराचा एखाद्याने बेकायदा ताबा घेतला असेल तर तुम्ही त्याच्या विरोधात सिव्हिल कोर्टात जाल. घरावर पुन्हा स्वत:चा ताबा घेण्याची कोर्टाकडे मागणी कराल. तसेच कम्पनसेशनसाठी (नुकसान भरपाई) दावा कराल. हे प्रकरण सिव्हिल जज हाताळतात. हक्क आणि नुकसान भरपाईशी संबंधित  सर्व खटल्याची सुनावरणी सिव्हिल कोर्टात केली जाते.
- दुसरीकडे, जेव्हा तुम्ही घराचा बेकायदा ताबा घेणार्‍याच्या विरोधात नुकसान भरपाईचा दावा क्रिमिनल अर्थात फौजदारी कोर्टात करतात. या खटल्याची सुनावणी दंडाधिकारी करतात.

 

कोण कुठल्या कोर्टात बसते...?
- सिव्हिल जज लोअर कोर्टात (कनिष्ठ कोर्ट) बसतात. या कोर्टाला ज्यूडिशियल मजिस्ट्रेट फर्स्ट क्लास अथवा सेकंड क्लास असेही संबोधले जाते.
- जिल्ह्या स्तरावरील कोर्टात सिव्हिल खटले सादर केले जातात. या कोर्टाला डिस्ट्रिक्ट कोर्ट असेही संबोधले जाते.
- क्रिमिनल अर्था फौजदारी खटले सेशन कोर्टात सादर केले जातात.
- जिल्हा न्यायाधीश सिव्हिल खटल्यांची तर सत्र न्यायाधीश क्रिमिनल खटल्यांची सुनावणी करतात. वरीष्ठ कोर्टात दोन्ही जज असतात.
- हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात त्यांना न्यायमूर्ति असे संबोधले जाते.

बातम्या आणखी आहेत...