Home | Maharashtra | Pune | Difference in Maratha kranti morcha Woman To Start Own Committee in Pune

मराठा मोर्चाने डावलल्याने स्वतंत्र महिला क्रांती मोर्चा; ७ सप्टेंबर रोजी जाहीर करणार पुढील भूमिका

प्रतिनिधी | Update - Sep 05, 2018, 07:36 AM IST

मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या आजवरच्या कार्यपद्धतीत महिलांना कोणतेही स्थान नाही.

 • Difference in Maratha kranti morcha Woman To Start Own Committee in Pune

  पुणे- मराठा आरक्षणाचा लढा निर्णायक टप्प्यावर असताना मराठा क्रांती मोर्चातील महिलांनी संघटनेच्या कार्यपद्धतीचा निषेध करत 'सकल मराठा महिला क्रांती मोर्चा' या नावाने स्वतंत्र राज्यस्तरीय समितीची स्थापना केली आहे. मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या आजवरच्या कार्यपद्धतीत महिलांना कोणतेही स्थान नाही, निर्णय प्रक्रिया-राज्यस्तरीय समित्यांत एकाही महिलेला प्रतिनिधित्व नाही.


  संघटनेत खांद्याला खांदा देऊन संघर्ष करणाऱ्या महिलांना डावलले जात असल्याचा निषेध म्हणून महिलांची राज्यस्तरीय समिती स्थापन करत असल्याची माहिती महिला क्रांती मोर्चाच्या उषा पाटील आणि त्यांच्या सहकारी महिलांनी मंगळवारी पुण्यात दिली. तसेच ७ सप्टेंबर रोजी पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले.


  नव्याने स्थापन समितीला विरोध

  पत्रकार परिषदेत काही मराठा महिलांनी नव्याने स्थापन केलेल्या राज्यस्तरीय समितीला विरोध दर्शवला तसेच घोषणाबाजी केली. बहुसंख्य महिला सहकाऱ्यांना अंधारात ठेवून, उषा पाटील यांनी कोणत्या अधिकारात राज्यस्तरीय महिला क्रांती मोर्चा समितीची सुरुवात केली, याचा खुलासा विरोध करणाऱ्या महिलांनी विचारला.


  महिलांची समिती कशी काय बनवली?

  मराठा आरक्षण मोर्चाशी संबंधित प्राची दुधाणे, पूजा झोळे, सारिका जगताप म्हणाल्या, 'राज्यस्तरीय समितीची स्थापना राज्यातील महिला कार्यकर्त्यांना कल्पनाही न देता कशी काय केली जाते? आम्ही पुण्यात काम करत आलो आहोत, पण पुण्यात अशी समिती स्थापन केल्याची गंधवार्ताही नाही. कित्येक सहकारी मैत्रिणींनाही याची कल्पना नाही. महिलांना प्रतिनिधित्व असावे, हे योग्य वाटते, पण त्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन पारदर्शीपणाने काम केले पाहिजे. परस्पर राज्यस्तरीय समिती स्थापन करणे, पटण्यासारखे नाही. त्यापूर्वी किमान समन्वयकांशी चर्चा करणे अपेक्षित होते.'


  महिलांना समन्वयकपदी स्थान नाही
  उषा पाटील म्हणाल्या, मराठा आरक्षणाच्या संघटनेच्या कार्यपद्धतीत, निर्णयप्रक्रियेत, राज्यस्तरीय वा जिल्हास्तरीय निर्णयात महिलांना कुठलेही प्रतिनिधित्व नाही. पुण्यात १ तारखेला झालेल्या राज्यभरातील बैठकीतही महिलांना स्थान नव्हते. मोर्चाचे नेतृत्व महिला करतात, निवेदने महिलांचे शिष्टमंडळ देते, महिलांचा खूप मोठा सहभाग मोर्चात असतो, पण महिलांना अपेक्षित स्थान दिले जात नाही. समन्वयकपदी महिलांना स्थान नाही. हे अपमानास्पद आहे. त्यामुळे राज्यभरातील महिलांना एकत्रित करण्याचा प्रयत्न आहे. मूळ संघटनेत फूट पाडण्याचा किंवा स्त्री-पुरुष वादाचा मुद्दा यामागे नाही.


  आंदोलन वळवण्याचा प्रयत्न : मराठा माेर्चा
  'काही महिला 'सकल मराठा महिला क्रांती मोर्चा' या नावाने मूळ संकल्पनेशी विसंगत पद्धतीने अांदाेलनाची दिशा वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा आणि सकल मराठा क्रांती मोर्चाचा दुरान्वयेही संबंध नाही. आम्ही मूळ मोर्च्यातील महिला 'सकल मराठा क्रांती मोर्चा' याच नावाखाली कार्यरत राहणार आहोत,' असे पत्रक मराठा क्रांती मूक मोर्चा, महाराष्ट्र यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.

  महिलांना समन्वयकपदी स्थान नाही
  सकल मराठा महिला क्रांती मोर्चाच्या उषा पाटील म्हणाल्या, मराठा आरक्षणाच्या संघटनेच्या कार्यपद्धतीत, निर्णयप्रक्रियेत, राज्यस्तरीय वा जिल्हास्तरीय निर्णयात महिलांना कुठलेही प्रतिनिधित्व नाही. पुण्यात 1 तारखेला झालेल्या राज्यभरातील समन्वयकांच्या बैठकीतही महिलांना कोणतेही स्थान नव्हते. याविषयी समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. मोर्चाचे नेतृत्व महिला करतात, निवेदने महिलांचे शिष्टमंडळ देते, महिलांचा खूप मोठा सहभाग मोर्चात असतो, पण महिलांना अपेक्षित स्थान दिले जात नाही. समन्वयकपदी महिलांना स्थान नाही. हे अपमानास्पद आहे. त्यामुळे राज्यभरातील महिलांना एकत्रित करण्याचा प्रयत्न आहे. मूळ संघटनेत फूट पाडण्याचा किंवा स्त्री-पुरुष वादाचा मुद्दा यामागे नाही.

  महिलांची समिती कशी काय बनवली?
  मराठा आरक्षण मोर्चाशी संबंधित प्राची दुधाणे, पूजा झोळे, सारिका जगताप म्हणाल्या, राज्यस्तरीय समितीची स्थापना राज्यातील महिला कार्यकर्त्यांना कल्पनाही न देता कशी काय केली जाते, हे समजत नाही. आम्ही पुण्यात काम करत आलो आहोत, पण पुण्यात अशी समिती स्थापन केल्याची गंधवार्ताही नाही. आमच्या कित्येक सहकारी मैत्रिणींनाही याची कल्पना नाही. महिलांना प्रतिनिधित्व असावे, हे योग्य वाटते, पण त्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन पारदर्शीपणाने काम केले पाहिजे. परस्पर समिती स्थापन करणे, तिला राज्यस्तरीय समिती म्हणणे हे पटण्यासारखे नाही. त्यापूर्वी किमान समन्वयकांशी चर्चा करणे अपेक्षित होते.

Trending