ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार / ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांची प्रकृती खालावली; लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना छातीच्या संसर्गामुळे तातडीने लीलावती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

दिव्य मराठी वेब टीम

Sep 06,2018 07:16:00 AM IST

मुंबई- बाॅलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना बुधवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वत: दिलीपकुमार यांनीच ट्विटरवर ही माहिती दिली.


छातीमध्ये झालेल्या विषाणूबाधेमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लीलावती रुग्णालयाती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीपकुमार यांच्या प्रकृतीविषयी फारशी चिंता करण्याचे कारण नाही. ते नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आले आहेत. दोन-तीन दिवसांनंतर त्यांना घरी पाठवण्यात येईल.

यापूर्वी दिलीप कुमार यांना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले होते. डिहाइड्रेशनमुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. 'ट्रॅजेडी किंग' या नावाने फेमस असलेले दिलीप कुमार यांची प्रकृती मागील काही वर्षांपासून नरमगरम आहे.

दादासाहेब फाळके पुरस्काराने सम्मानित दिलीप कुमार यांना एप्रिलमध्येही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले होते. ते तापाने फणफणले होते. तसेच त्यांच्या छातीत संसर्ग झाला होता.

देवदास, मुगल-ए-आझम सारखे सदाबहार सिनेमे देणार्‍या दिलीप कुमार यांना 2015 मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते.

X
COMMENT