आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन न करता मूर्ती मांडवातच ठेवणार; पुण्यात डीजे वाजवण्यावर बंदीचा मंडळांकडून निषेध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- उच्च न्यायालयाने मिरवणुकीत डीजे वाजवण्यावर बंदी घातल्याने अनेक गणेश मंडळे आणि कार्यकर्ते नाराज झाले असून या बंदीचा निषेध म्हणून श्रींच्या मूर्तीचे विसर्जन न करता मूर्ती मांडवातच ठेवण्याची भूमिका घेतली आहे. न्यायालयाचा निर्णय आयत्या वेळी करण्यात आला आहे, तसेच मंडळांना पर्यायी व्यवस्था उभारण्याचा अवधीही देण्यात आलेला नाही, अशी तक्रार गणेश मंडळ कार्यकर्ते तसेच काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली.

 

मुख्यमंत्र्यांनी आता स्वत:च्या विशेषाधिकाराचा वापर करून गणेश मंडळांना व कार्यकर्त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.  न्यायालयाच्या निर्णयाविरोधात शनिवारी गणेश मंडळे  तसेच डीजे मालकांची बैठक झाली. त्यानंतर शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांनी भूमिका मांडली. ‘न्यायालयासमोर डीजे मालकांचीभूमिका समर्थपणे मांडण्यात सरकार कमी पडले आहे. या निर्णयाने उत्सव अडचणीत आला आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आम्ही मूर्तीचे विसर्जन न करता मूर्ती मांडवातच ठेवणार आहोत. बैठकीला ९० गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते,’ असेही ते म्हणाले.

 

हिंदू सणांच्या वेळीच बंदी का?   
हिंदू सणांच्या वेळीच सरकारला बंदी घालण्याची आठवण का होते, असा सवाल या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केला. सरकारला न्यायालय आणि प्रशासन, पोलिस यांच्यात संघर्ष निर्माण करायचा आहे का, असेही विचारले गेले. आम्ही मात्र संघर्षाची भूमिका न घेता न्याय मिळावा, यासाठी आमदार, खासदारांना भेटून मध्यस्थीची विनंती करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात वैयक्तिक लक्ष घालावे, अशीही आमची मागणी आहे, असे डीजे मालकांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...