आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत मराठी फॅमिलीत डबल मर्डर..दिवसाढवळ्या घरात घसून केली 2 सख्या वयोवृद्ध बहिणींची निर्घृण हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीत एका म‍राठी कुटुंबात दिवसाढवळ्या दुहेरी हत्या झाल्याचे समोर आले आहे. अज्ञात मारेकरीने घरात घुसून दोन सख्या वयोवृद्ध बहिनींची निर्घृण हत्या केली आहे.  आशा पाठक आणि उषा पाठक असे हत्या करण्यात आलेल्या दोन्ही बहिणींची नावे आहेत. पोलिसांनी दोघींच मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमार्टमसाठी पाठविले आहेत.

 

दिल्लीतील पश्चिम विहारमध्ये गुरुवारी दुपारी  ही घटना घडली. एकीचा गळा आवळून तर दुसरीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्‍यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिस मारेकर्‍याचा शोध घेत आहेत.

 

सेवानिवृत्त दोन्ही बहिणी

दोन्ही बहिणी सेवानिवृत्त होत्या. 35 वर्षांपासून त्यासोबत राहात होत्या.  उषा पाठक या यूपीमधील एका कॉलेजात म्युझिक टीचर होत्या तर आशा पाठक या कृषी भवनमध्ये लायब्रेरियन होत्या.

बातम्या आणखी आहेत...