आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मासिक पाळीबाबत शाळा, महाविद्यालयात खुलेपणाने चर्चा आवश्यक- डॉ.कानन येळीकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मासिक पाळी हा न चर्चिला जाणारा पण अत्यंत महत्वाचा विषय आहे. मासिक पाळीदरम्यान योग्य काळजी न घेतल्यास किशोरवयीन मुली, तरुणी आणि महिलांमध्ये असंख्य आजार होण्याची दाट शक्यात असते. त्यासाठी शाळा आणि महाविद्यालयात मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची काळजी यावर खुलेपणाने चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचे मत शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता तथा स्त्रीरोगतज्ज्ञ प्रा. डॉ.कानन येळीकर यांनी व्यक्त केले.

 

लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद – गोल्डतर्फे मोफत सॅनिटरी नॅपकीन वितरणच्या उद्घाटनप्रसंगी श्री धारेश्वर हायस्कूल (पळशी, ता.जि. औरंगाबाद) येथे गुरुवारी त्या बोलत होत्या. यावेळी शाळेतील चारशेच्या आसपास विद्यार्थिनींची उपस्थिती होती.

 

यावेळी लायन्स क्लबचे द्वितीय उपप्रांतपाल विवेक अभ्यंकर, स्नेहल अभ्यंकर, वैशाली उगले, रचना दाशरथे, डॉ. कृती पाथ्रीकर, सोनाली लेंभे, मनीषा हिरप, गोल्डचे अध्यक्ष प्रसन्न उगले, सचिव मृगांग लेंभे, किशोर ललवाणी, राहुल दाशरथे, प्रवीण काला, सुदेश चुडीवाल, आनंद देसाई, डॉ. अमोल पाथ्रिकर आणि प्रकल्पप्रमुख अभिजित हिरप यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर मुख्यध्यापक पी.एस. भवर, लतिका कुलकर्णी, सुरेखा भागवत आणि प्रतिभा तुके यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 

डॉ. येळीकर म्हणाल्या कि, शालेय विद्यार्थिनींनी मासिक पाळीबद्दल आपल्या आईशी मोकळेपणाने बोलायला हवे. या दरम्यान योग्य काळजी न घेतल्यास कर्करोगासारख्या आजाराला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या शालेय विद्यार्थिनी म्हणजे भारताचे भवितव्य आहे. जगाशी स्पर्धा करतांना चांगले आरोग्य असणे अत्यावश्यक आहे. सॅनिटरी नॅपकीन वापरणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका अत्यंत कमी होतो. येत्या काळात लायन्सच्या माध्यमातून ही शाळा नक्कीच मॉडेल म्हणून उभी राहील. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा आणि शिक्षकांचीही आहे.  प्रस्तावनेत मनिषा हिरप म्हणाल्या, कि आजपासून तीनशे विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीन दिले जाणार आहेत. येत्या वर्षभरात एक हजार शालेय विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीन मोफत देण्याचा आमचा मानस आहे.

 
आम्ही अधिकारी, डॉक्टर होणार...
यावेळी डॉ. येळीकर यांनी उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधला. तेव्हा विद्यार्थिनींनी दिलखुलासपणे उत्तरे देत आम्ही कोणत्या गावातून येतो, कसे येतो, काय अडचणी येतात याबदल सांगितले. तसेच तुम्हाला काय व्हावेसे वाटते? यावर कोणी डॉक्टर, जिल्हाधिकारी, वकील, पोलीस व्हायचे असल्याचे उत्स्फूर्तपणे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रचना दाशरथे यांनी केले, आभार वैशाली उगले यांनी मानले.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...संबंधित फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...