Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Dr.Babasaheb Ambedkar Planning About Aurangabad And His Goods In Milind College

डॉ.बाबासाहेबांना औरंगाबादचे नाव ठेवायचे होते पुष्‍पनगर..पाहा,मिलिंद कॉलेजातील अनमोल ठेवा

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 12:00 PM IST

मिलिंद कॉलेजच्या इमारतीचा प्‍लॅन कोण्या वास्‍तुशास्‍त्रज्ज्ञने नव्‍हे तर स्‍वत: बाबासाहेबांनीच तयार केला होता.

 • Dr.Babasaheb Ambedkar Planning About Aurangabad And His Goods In Milind College

  औरंगाबाद- मिलिंद कॉलेजचे शिल्‍पशास्‍त्रज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर औरंगाबादच्‍या मिलिंद सायन्‍स कॉलेजचे होस्‍टेल, आर्टस् कॉलेजचे होस्‍टेल व मिलिंद हायस्‍कूल या इमारतीचे प्‍लॅन खुद्द बाबासाहेबांनी तयार केला होता. हे वाचून तुम्हाला आश्‍यर्च वाटले असेल, पण हे सत्य आहे.

  मिलिंद कॉलेजच्या इमारतीचा प्‍लॅन कोण्या वास्‍तुशास्‍त्रज्ज्ञने नव्‍हे तर स्‍वत: बाबासाहेबांनीच तयार केला होता.

  आज 6 डिसेंबर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही आपल्यासाठी खास माहिती घेऊन आलो आहे.

  आज या इमारती पाहून बाबासाहेब शिल्‍पाशास्‍त्रातही किती पारंगत होते याची खात्री पटते. बाबासाहेब व्‍हाईसरॉयच्‍या एक्झिक्‍युटिव्‍ह कौन्सिलमध्‍ये मजूरमंत्री असतांना त्‍यांच्‍याकडे PWD खातेही होते तेव्‍हा स्‍वप्रयत्‍नाने त्‍यांनी शिल्‍पशास्‍त्रात प्राविण्‍य मिळविले होते. मजूरमंत्री असतांना एकदा त्‍यांनी इंजिनिअर्सच्‍या परिषदेसाठी देशभरातून आलेल्‍या इंजिनियरांसमोर शिल्‍पशास्‍त्रावर उत्‍कृष्‍ट भाषण करुन चकित केले होते.

  पुढील स्‍लाइड्‍वर वाचा,
  - औरंगाबादसंबंधीच्‍या योजना
  - मराठवाड्याच्‍या विकास योजना
  - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेली काठी, खूर्ची आणि बरेच काही...
  - बाबासाहेबांनी वापरलेल्‍या संदर्भ ग्रंथांचे ग्रंथालय
  - मिलिंद महाविद्यालयातील बाबासाहेबांचे दुर्मिळ छायाचित्रे

 • Dr.Babasaheb Ambedkar Planning About Aurangabad And His Goods In Milind College

  औरंगाबादसंबंधीच्‍या योजना

  औरंगाबादबद्दल बाबासाहेबांना आकर्षण वाटत असे. मिलिंदच्‍या नागसेन वनाचा परिसर अत्‍यंत सुशोभित करण्‍यासाठी त्‍यांची सतत धडपड चाललेली असे. भेटीला येणाऱ्या लोकांसाठी झाड लावण्‍याची त्‍यांनी सक्‍तीच केलेली होती. तसेच स्‍वत:च्‍या देखरेखीखाली त्‍यांनी निरनिराळ्या प्रकारची शेकडो झाडांची रोपटी लावलेली होती. कॉलेजच्‍या परिसरात बुध्‍द विहार, स्‍टाफ क्‍वार्टर्स, गेस्‍ट हाऊस, समृध्‍द वाचनालय, क्रीडांगण तसेच मिलिंद कॉलेजच्‍या इमारतीसमोर उंच व भव्‍य टॉवर बनवून त्‍यावर मोठे घड्याळ बसवावे, अशा त्‍यांच्‍या अनेक कल्‍पना होत्‍या. त्‍यातील काहींना मूर्त स्‍वरुप आले तर काहींना त्‍यांच्‍या निर्वाणामुळे पुऐ येऊ शकले नाही.

 • Dr.Babasaheb Ambedkar Planning About Aurangabad And His Goods In Milind College

  अनाथ आश्रम
  सायन्‍स कॉलेजजवळील वराळे यांनी घेतलेल्‍या प्‍लॉटवर बंगला बांधण्‍याची बाबासाहेब व माईसाहेब यांची  कल्‍पना होती. उर्वरित आयुष्‍य औरंगाबादलाच व्‍यतीत करण्‍याची त्‍यांची मनिषा होती. आपल्‍या बंगल्‍याजवळच अनाथ आश्रम उघडण्‍याचा बाबासाहेबांचा विचार होता. अनाथांची सेवा करण्‍यात त्‍यांना आगळाच आनंद मिळत असे. ते नेहमी म्‍हणत, 'अनाथ, गरीब, निराधार कुमारी मातांनी टाकलेले मुले आश्रमात ठेवून त्‍यांची देखभाल करण्‍याची माझी तीव्र मनिषा आहे.'

 • Dr.Babasaheb Ambedkar Planning About Aurangabad And His Goods In Milind College

  मराठवाड्याच्‍या विकास योजना
  मराठवाडा विभाग अत्‍यंत मागासलेला असल्‍याने त्‍यातील अस्‍पृश्‍यांचे हाल विचारायला नको, आणि त्‍या भागाचा विकास झाला तरच अस्‍पृश्‍यांचाही विकास होईल्‍, अशी बाबासाहेबांची धारणा होती. त्‍यादृष्‍टीने मराठवाड्याचा विकास व्‍हावा म्‍हणून त्‍यांनी बऱ्याच योजना आखलेल्‍या होत्‍या. त्‍यासाठी ते प्रयत्‍नशीलही होते. मराठवाड्यातही स्‍वतंत्र विद्यापीठ असावे, औरंगाबाद- पुणे रहदारीने जोडण्‍यासाठी कायगाव टोके येथे गोदावरी नदीवर पुल बांधावा, व्‍यापारवृध्‍दी व प्रवासासाठी मनमाड-औरंगाबाद ही रेल्‍वे लाईन ब्रॉड गेज करावी. औरंगाबादला विमानतळ करावा, मुंबईला जाण्‍यासाठी मनमाड-नाशिक असा लांब  वळसा घालण्यापेक्षा संगरनेरमार्गे जवळचा रस्‍ता (Short Cut Road) करण्यात यावा, औरंगाबाद शहराचे 'पुष्‍पनगर' असे नामकरण करण्‍यात यावे, तसेच देशातील मजुरांच्‍या सहभागाने सहकारी कापड गिरणी काढावी. औरंगाबाद नभोवाणी केन्‍द्र सुरु करण्‍यात यावे, अशा एक ना अनेक योजना त्‍यांच्‍या मनात होत्‍या.

 • Dr.Babasaheb Ambedkar Planning About Aurangabad And His Goods In Milind College

  या सर्व योजनाचे महत्‍त्‍व आज सरकारला तसेच जनतेलाही पटलेले दिसते. यावरुन बाबासाहेबांची दूरदृष्‍टी दिसून येते. यापैकी बऱ्याच योजना मूर्त स्‍वरुपात आलेल्‍या आहेत. पण काही योजनांचे महत्‍त्‍व पटूनही अजून प्रत्‍यक्षात आलेल्‍या नाहीत. यासर्व विवेचनावरुन बाबासाहेबांची दूरदृष्‍टीचा प्रत्‍यय आल्‍याशिवाय राहणार नाही.

 • Dr.Babasaheb Ambedkar Planning About Aurangabad And His Goods In Milind College

  कोलंबिया विद्यापीठाचा बहुमान
  भारतातील विद्यापीठांनी अनेकांना 'डॉक्‍टरेट' देऊन गौरव केलेला आहे. परंतु साहेबांच्‍या विद्वत्‍तेला, प्रकांड पांडित्‍याला व त्‍यांनी केलेल्‍या ऐतिहासिक कार्याला साजेसा गौरव भारतातील कोणत्‍याही विद्यापीठाने केला नाही. यातून या देशातील विद्यापीठांची सनातनी वृत्‍तीच दिसून येते. वास्‍वतिक पाहता कोणाही विद्यापीठाच्‍या गौरवाने बाबासाहेबांच्‍या विद्वत्‍तेत काहीही फरक पडला नसता. उलट डॉ. आंबेडकरांचा गौरव केल्‍याने त्‍या विद्यापीठाचाच खरा गौरव झाला असता. त्‍याला फक्‍त हैदराबादच्‍या उस्‍मानिया विद्यापीठाचाच अपवाद आहे.

 • Dr.Babasaheb Ambedkar Planning About Aurangabad And His Goods In Milind College

  औरंगाबादची एक संध्‍याकाळ...
  संध्‍याकाळी जेवणानंतर बंगल्‍याच्‍या आवारात बाबासाहेब, माईसाहेब मित्रमंडळीसोबत खुर्च्‍या टाकून बसत असत. त्‍यावेळी निरनिराळ्या विषयांवरील चर्चांना आगळाच रंग येत असे. या बैठकी म्‍हणजे ज्ञान आणि मनोरंजन यांचा खनिजाच असत. काही वेळा बाबासाहेब आपल्‍या जीवनातील, विशेषत: बालपणातील आठवणी सांगत असत. आठवणी सांगतांना ते एखाद्या नटाप्रमाणे आवाजातील चढउतारासह अभिनय करुन प्रत्‍येक गोष्‍ट अगदी रंगवून सांगत. त्‍यामुळे उपस्थित मंडळी अक्षरश: पोट धरुन हसत असत.

 • Dr.Babasaheb Ambedkar Planning About Aurangabad And His Goods In Milind College

  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेली काठी, खूर्ची आणि बरेच काही...
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. ते हयात असताना त्यांनी वापरलेली काठी, खूर्ची, भांडी, कपडे, बेड इत्यादी दुर्मिळ वस्तू याच महाविद्यालयामध्ये संग्रहित ठेवण्यात आल्या आहेत.

  पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...मिलिंद कॉलेजातील अनमोल ठेवा

Trending