आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई एअरपोर्टच्या रनवेची दुरुस्ती-देखभाल...दोन धावपट्‍टया 6 तास बंद; 300 उड्डाणांवर परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवे दुरुस्तीच्या कामामुळे मंगळवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. याचा परिणाम तब्बल 300 उड्डाणांवर झाला आहे. एअरलाईन्स कंपन्यांनी अनेक फ्लाइट्स रद्द केल्या आहेत. या संदर्भात 3 महिन्यांपूर्वीच माहिती देण्यात आली होती.

 

मिळालेली माहिती अशी की, मुंबई विमानतळावरील 09/ 27 आणि 14/ 32 ही मुख्य आणि दुय्यम धावपट्टी दुरुस्ती-देखभालीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आली आहे. यामे मंगळवारी विमानतळावरुन कोणतेही विमान उड्डाण घेणार नाही किंवा उतरणार नाही.

 

या कामाचा दुसरा टप्पा 7 फेब्रुवारी आणि 30 मार्च 2019 दरम्यान येणाऱ्या मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी होणार आहे. यादरम्यानही रनवे सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येईल.

 

एका दिवसात‍ 970 फ्लाइट्स...

मुंबई विमानतळावर दररोज 970 फ्लाइट्स उड्‍डाण घेतात आणि उतरतात. 4 कोटी प्रवाशांची क्षमता असलेल्या या विमानताळाचा वापर वर्षभरात 4 कोटी 80 लाख प्रवाशांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...