Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | dutta temple donation box robbery in Sangamner Robbers caught on camera

दत्त मंदिरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी फोडली दानपेटी; चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 03:02 PM IST

दुपारच्या वेळी मंदिरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दानपेटीवर डल्ला मारला.

  • dutta temple donation box robbery in Sangamner Robbers caught on camera
    नगर- दत्त मंदिरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी दानपेटी फोडून रक्कम लांबविल्याची घटना समोर आली आहे. ही घटना संगमनेर तालक्यातील श्री क्षेत्र अकलापूर येथील दत्त मंदिरात घडली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मंगळवारी (6 नोव्हेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.

    दुपारच्या वेळी मंदिरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दानपेटीवर डल्ला मारला. घारगाव पोलिसांनी घटनास्थळाची पाहाणी केली. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेत आहेत. चोरट्यांनी नेकमी किती रक्कम लांबविली ही माहिती समजू शकली नाही.

    दरम्यान, दोन वर्षांपूर्वी याच मंदिरात मोठी चोरी झाली होती. चोरट्यांनी दत्त मंदिरावरील सोन्याचा मुलामा असणारा कळस कापून पोबारा केला होता. या घटनेचा तपास अद्याप लागलेला नाही.

Trending