Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Dynamic IAS Officer And Nashik Municipal Corporation Commissioner Tukaram Munde Story

मंत्री, आमदारांना वेटिंग करायला लावतो हा IAS अधिकारी, 12 वर्षांत 10 वेळा झाली बदली

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 31, 2018, 12:29 PM IST

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकीक मिळवलेले तुकाराम मुंडे हे गरीब व सामान्यांसाठी काम करतात.

 • Dynamic IAS Officer And Nashik Municipal Corporation Commissioner Tukaram Munde Story

  नाशिक- 'माझी बदली करुन नाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर नक्कीच बदली करा,' असे नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे म्हणाले आहेत. शिवाय वारंवार बदली केली जाते याचे नक्कीच वाईट वाटते, पण निर्णय शासनाचा असतो, अशी खंतही मुंडे यांनी व्यक्त केली.

  कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकीक मिळवलेले तुकाराम मुंडे हे गरीब व सामान्यांसाठी काम करतात. भारतीय प्रशासन अधिकारी (IAS) तुकाराम मुंढे यांना गेल्यावर्षी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी मुंडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी केली होती. त्यामुळे मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याआधी तुकाराम मुंढे पुण्यातील पीएमपीएमएलचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना आपल्या कामाची छाप सोडली होती.


  मुंढे हे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिकारी आहेत. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सरकारच्या कल्याणकारी योजना पोहोचायला हव्यात, अशी त्यांची तळमळ असते. याचे कारण ते स्वत: एक गरीब व सामान्य कुटुंबातून पुढे आहेत. गरिबी काय असते ते त्यांनी लहानपणापासूनच पाहिले, अनुभवले आहे. त्यामुळेच मोठा सरकारी अधिकारी असूनही त्यांचे राहणीमान सामान्यच आहे. ते मनानेही संवेदनशील आहेत.

  मराठवाड्यासारख्या दुष्काळी व मागास भागात बालपण गेल्याने व जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतल्याने मुंढे यांना 'आहे रे आणि नाही रे' वर्गाची पक्की जाण आहे. त्यामुळेच ते एक कठोर व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पुढे आले.

  एखाद्या सामान्य व्यक्तीला जी वेळ दिली ते पाळतात मग त्या वेळेत मंत्री, खासदार-आमदार आला तरी त्यांना ताटखळत बसायला लावतात. त्यामुळेच अनेक बडे नेते व लोकप्रतिनिधी तुकाराम मुंढेंबाबत सरकार दरबारी तक्रार करत असतात. एखादा अधिकारी आम्हाला वेटिंग करायला लावतो हेच मूळी बड्या नेत्यांना ढाचते. त्यामुळेच 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या मुंढेंची 11 वर्षांत तब्बल 9 वेळा बदली करण्यात आली आहे.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविषयी...

 • Dynamic IAS Officer And Nashik Municipal Corporation Commissioner Tukaram Munde Story

  जिल्हा परिषद शाळेत झाले शिक्षण-
  तुकाराम मुंढे हे मूळचे बीड जिल्ह्यातील ताडसोना गावचे रहिवासी आहेत. गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तुकाराम यांचे शिक्षण तेथेच जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे पदवीचे शिक्षण घेण्यासाठी ते औरंगाबादला शिफ्ट झाले. तेथेच मास्टर डिग्री घेत त्यांनी यूपीएससीची तयारी केली.

 • Dynamic IAS Officer And Nashik Municipal Corporation Commissioner Tukaram Munde Story

  11 वर्षांच्या सेवेत 9 वेळा बदली-
  तुकाराम मुंढे हे 2005 साली यूपीएससी परीक्षेत देशात पहिल्या 50 मध्ये आले. त्यामुळे त्यांना गृहराज्याचे केडर मिळाले. त्यांनी आपल्या मागील दहा-आकरा वर्षाच्या काळात लँड माफिया, सँड माफिया तसेच भ्रष्टाचारी राजकारण्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. सोलापूर येते जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी टॅंकर लॉबीचा घोटाळा उघडवीस आणला होता. नवी मुंबई येथे असतानाही त्यांनी सध्या भ्रष्टाचाराच्या कुराण बनलेल्या महापालिकेतील भ्रष्टाचार खाणून काढला होता. राजकारण्यांची दुकाने बंद केल्याने मुंढेंची तेथून वर्षाच्या आताच बदली केली. 

 • Dynamic IAS Officer And Nashik Municipal Corporation Commissioner Tukaram Munde Story

  सामान्य लोकांना हवे असतात मुंढे-
  मुंढे यांचा वचक असल्याने भले भले राजकारणी व नोकरशाहीतील कंपू अधिकारी त्यांना घाबरतात. मात्र, सामान्य लोक त्यांच्या बाजूने उभे राहतात. जालना असो की सोलापूर व  मध्यंतरी नवी मुंबईतून बदली झाली तेव्हा सामान्य लोक त्यांची बदली रद्द व्हावी यासाठी आंदोलने, मोर्चे काढतात. मात्र, स्थानिक नेते वरिष्ठ पातळीवर येथून पक्ष संपवायचा आहे का असे ब्लॅकमेल करून त्यांची बदली करायला भाग पाडतात.

 • Dynamic IAS Officer And Nashik Municipal Corporation Commissioner Tukaram Munde Story

  वाळू माफियांनी जीवे मारण्याचा केला होता प्रयत्न-
  तुकाराम मुंढे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून जास्तच दबदबा निर्माण केला. वाळू माफियांना मुंढे यांनी सळो की पळो करून सोडले. पोलिस प्रशासनातील खाबू अधिकारी काही वेळा अशा माफियांना राजकारण्याच्या दबावामुळे व लाचखोरी करून सोडून द्यायचे. मात्र, जिल्हा पोलिस प्रमुखापेक्षा जिल्हाधिकारीच हा प्रोटोकॉलनुसार प्रमुख असतो हे त्यांनी दाखवून दिले होते व आपल्या तत्वात जे बसत नाही ते करणार नाही यावर ठाम राहिले. जानेवारी 2016 मध्ये त्यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला होता. मात्र, फिट अॅंड फाईन मुंढेंनी आपली सहीसलामत सुटका करून घेतली होती.

 • Dynamic IAS Officer And Nashik Municipal Corporation Commissioner Tukaram Munde Story

  कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सरकारकडून गौरव-
  राजकारण्यांना तुकाराम मुंढे यांची कार्यशैली व झिरो टॉलरन्स पद्धत आवडत नसली तरी सरकारी पातळीवर मात्र त्यांच्या कामाचे कौतूक होत आले आहे. 2015-2016 या वर्षात सर्वोत्तम कामगिरीसाठी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.

 • Dynamic IAS Officer And Nashik Municipal Corporation Commissioner Tukaram Munde Story

  सामान्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी वॉक वुईथ कमिशनर उपक्रम-
  जनसामान्यांच्या दैनंदिन अडचणी नेमक्या काय आहेत हे प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी तुकाराम मुंढे यांना वेळ मिळत नाही. दिवसभर ते आपल्या कामात असतात. सकाळी त्यांना 9 ला घरातून बाहेर पडावे लागते. रात्री कधी परत येणार हे माहित नसते. त्यामुळे सामान्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी मुंढे यांनी नवी मुंबईत असताना वॉक वुईथ कमिशनर हा उपक्रम राबविला होता. त्याला मोठा प्रतिसाद मिळत असे. लोक विविध भागातून येऊन मुंढे यांच्याबरोबर चालत व आपल्या भागातील समस्या सांगत. मुंढे तत्काळ संबंधित विभाग, प्रभागातील अधिका-यांना समस्या सोडवायला सांगत त्यामुळे नागरिक त्यांच्या या पद्धतीवर खूष होत.

 • Dynamic IAS Officer And Nashik Municipal Corporation Commissioner Tukaram Munde Story

  आयुक्त तुमच्या भेटीला-
  या उपक्रमांतर्गत वरिष्ठ अधिकारीवर्गासह आयुक्त प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या भागात जावून लोकांना भेटत. यावेळी चर्चा केल्यानुसार लोकांच्या सूचनांची दखल घेवून त्यात सुधारणा होत आहे की नाही याची माहिती घेणारी यंत्रणा त्यांनी तयार केली.

 • Dynamic IAS Officer And Nashik Municipal Corporation Commissioner Tukaram Munde Story

  नवी मुंबईत असताना कचरा व्यवस्थापनावरही भरीव काम-
  नवी मुंबईचे आयुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी पर्यावरणासाठी भरीव योगदान दिले. ओला व सूका कचरा वेगळा करून त्यावर लागलीच प्रक्रिया करणे, हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी व प्रदूषित पाण्यामुळे आजार होऊ नयेत म्हणून त्यांनी  वेस्ट मॅनेजमेंट क्षेत्रातही आपल्या कामाची चुणूक दाखवली.

 • Dynamic IAS Officer And Nashik Municipal Corporation Commissioner Tukaram Munde Story

  तुकाराम मुंढेंना केजरीवालांनी दिली होती लोकसभा निवडणूक लढविण्याची ऑफर-
  भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून समोर आलेले नवे राजकीय नेतृत्त्व म्हणून अरविंद केजरीवाल यांच्याकडे पाहिले गेले. त्यांनी तुकाराम मुंढेंची लोकाप्रती असलेली तळमळ पाहून त्यांना लोकसभा निवडणुकीत उभा राहण्याची ऑफर दिली. प्रारंभी ते तयार होते. मात्र, राजकारणात चढ-उतार असतात. अधिकारी म्हणून कायमच लोकांची सेवा करण्याची संधी मला परमेश्वराने दिली आहे असे सांगत त्यांनी राजकारणात जाण्यास नकार दिला होता.

 • Dynamic IAS Officer And Nashik Municipal Corporation Commissioner Tukaram Munde Story

  सोलापूर जिल्हा टॅंकरमुक्त-
  सोलापूर जिल्हा दुष्काळी व कमी पाण्याचा मानला जातो. तेथे पावसाळ्यातही काही भागात टॅंकरने पाणी पुरवावे लागते. यातून टॅंकरलॉबी निर्माण झाली. फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार योजना लागू केल्यानंतर राज्यात सर्वाधिक उत्तम काम तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्त्वाखाली सोलापूर जिल्ह्यात झाले. आज सोलापूर जिल्हा टॅंकरमुक्त झाला आहे.

 • Dynamic IAS Officer And Nashik Municipal Corporation Commissioner Tukaram Munde Story

  खाबू अधिका-यांना धडकी भरते मुंढेंची-
  भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्सची भूमिका घेणारे तुकाराम मुंढेंना केवळ राजकारणीत घाबरत नाहीत तर त्यांच्या हाताखाली विविध विभागात काम करणारे अधिकारी-कर्मचारी घाबरतात. स्थानिक नेत्यांना हाताशी धरून एकाच विभागात वर्षानवर्षे ठाण मांडून बसणे, कामावर उशिरा येणे, मध्येच घरी जेवायला जाणे, कामे पेंडिग ठेवणे, दिलेले काम वेळेत पूर्ण न करणे आदी प्रकरणात अनेक अधिका-यांना-कर्मचा-यांना त्यांनी निलंबित केले आहे. आता पुण्यात पीएमपीचे प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी लाचखोर व खाबूगिरी करणा-या अभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत की साईट पोस्टिंगला टाकले आहे.

 • Dynamic IAS Officer And Nashik Municipal Corporation Commissioner Tukaram Munde Story

  पंढरपूर शहरात वारीदरम्यान उत्तम नियोजनाचा वास्तूपाठ तुकाराम मुंढे यांनी घालून दिला.

Trending