आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवे मारण्याची धमकी मिळाली तरीही डगमले नाही तुकाराम मुंढे; गरिबी काय असते, हे जवळून अनुभवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गरीब व सामान्यांसाठी काम करणारे व कार्यक्षम अधिकारी असा नाव लौकिक असलेले भारतीय प्रशासन अधिकारी (IAS) तुकाराम मुंढे यांची बदली मंत्रालयातील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी करण्‍यात आली आहे. मुंढे यांना नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवून नियुक्तीच्या ठिकाणी जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

तुकाराम मुंढे सध्या पुण्यातील पीएमपीएमएलचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. त्याआधी त्यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तर नाशिक महापलिकाचे आयुक्त म्हणून काम करताना आपल्या कामाची छाप सोडली होती.

 

मुंढे हे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिकारी आहेतच पण समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सरकारच्या कल्याणकारी योजना पोहोचवल्या पाहिजेत, अशी तळमळ असते. याचे कारण ते स्वत: एक गरीब व सामान्य कुटुंबातून पुढे आहेत. गरिबी काय असते ते त्यांनी लहानपणापासूनच पाहिले, अनुभवले आहे. त्यामुळेच कदाचित मोठ्या पदावर कार्यरत असूनही त्यांचे राहाणीमान सामान्य आहे, तर मनाने संवेदनशील आहेत. मराठवाड्यासारख्या दुष्काळी व मागास भागात बालपण गेल्याने व जिल्हा परीषद शाळेत शिक्षण घेतल्याने मुंढे यांना आहे रे आणि नाही रे वर्गाची पक्की जाण आहे. त्यामुळेच ते एक कठोर व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पुढे आले.

 

एखाद्या सामान्य व्यक्तीला जी वेळ दिली ते पाळतात मग त्या वेळेत मंत्री, खासदार-आमदार आला तरी त्यांना ताटखळत बसायला लावतात. त्यामुळेच अनेक बडे नेते व लोकप्रतिनिधी तुकाराम मुंढेंबाबत सरकार दरबारी तक्रार करत असतात. एखादा अधिकारी आम्हाला वेटिंग करायला लावतो हेच मूळी बड्या नेत्यांना ढाचते. त्यामुळेच 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या मुंढेंची 12 वर्षांत तब्बल 10 वेळा बदली करण्यात आली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढे यांच्याबाबत...

 

बातम्या आणखी आहेत...