आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळ विस्तारात रुची उरली नाही, होईल तेव्हा बघू; एकनाथ खडसेंनी व्यक्त केली नाराजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आता आपल्याला रुची राहिलेली नाही, अशा शब्दांत आपली नाराजी प्रकट करून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रितपणे होतील, अशी शक्यता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. 

 

राज्य कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने भाजपने गुरुवारी मुंबईत निवडणुकीच्या तयारीचा अाढावा घेतला. बूथ कमिट्यांपासून प्रदेश पातळीपर्यंतच्या विषयात निवडणुका केंद्रस्थानी होत्या. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भ्रष्टाचार आणि वादग्रस्त आमदार राम कदम, मधू चव्हाणप्रकरणी मुंबईत ‘दिव्य मराठी’शी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खडसे यांची पाठराखण केली होती. खडसेंनी कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही, मात्र पक्षावर कसलेही बालंट येऊ नये म्हणून त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात सगळ्यांबरोबर त्यांचाही विचार केला जाईल, असेही दानवे म्हणाले होते.

 

जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने जळगावात आले असताना शुक्रवारी खडसेंनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, निवडणूक केव्हाही लागली तरी भाजप त्यासाठी तयार राहणार आहे. केंद्रीय कार्यकारिणीचा सदस्य असल्याने गेल्या महिन्यात दिल्लीत झालेल्या बैठकीलाही मी उपस्थित होतो. मुंबईत बैठकीत पक्षीय संघटन, निवडणुकीची तयारी या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. पक्षाचा नियोजित कार्यक्रम देण्यात आला आहे. त्यानुसार पक्ष संघटनेचे कार्य राज्यभरात सुरू आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्रितही लागू शकतात. ती शक्यता नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...