Home | Maharashtra | Mumbai | Ekta Kapoor Troll for her Dress in Diwali Party

दिवाळी पार्टीत आपली चोळी वारंवार अॅडजेस्ट करताना दिसली एकता कपूर, सोशल मीडियावर उडविली खिल्ली

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 10:58 AM IST

सोशल मीडियावर एकताचा हा व्हि‍डीओ झळकताच युझर्सनी तिची प्रचंड खिल्ली उडविली.

  • मुंबई- ड्रामा क्वीन एकता कपूर हिने गेल्या मंगळवारी रात्री तिच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. बॉलीबूडसह टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गजांनी पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीतील एकताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात ती स्वत:च्या ड्रेसवरून प्रचंड त्रस्त दिसत आहे. एकताने पार्टीत लाईट पिंक कलरचा घागरा-चोळी परिधान केला होता. परंतु तिला चोळी वारंवार अॅडजेस्ट करावी लागली. सोशल मीडियावर एकताचा हा व्हि‍डीओ झळकताच युझर्सनी तिची प्रचंड खिल्ली उडविली.

    एकताचा ड्रेसिंग सेन्स हॉरिबल...

    एकता कपूरचा ड्रेसिंग सेन्स हॉरिबल (भयावह) असल्याचे एका यूजरने म्हटले आहे तर दुसर्‍याने तिला 'थुलथुली' असे संबोधून तिची खिल्ली उडविली आहे. एकताच्या स्कीनला जे ड्रेस अनकम्फर्टेबल वाटतात तर ती असे ड्रेस परिधान का करते, असा सवाल एका युझरने उपस्थित केला आहे.

    एकताच्या या पार्टीला शिल्पा शेट्टी, अरबाज खान आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी, करण जोहर, कृति सेनन, डेव्हिड धवन, श्रद्धा कपूर, नुसरत भरूचा आणि नेहा धूपिया सारखे स्टार्स उपस्थित होते. टीव्ही इंडस्ट्रीतील दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दाहिया, करण पटेल आणि पत्नी अंकिता भार्गव, क्रिस्टल डिसूझा, गायक नेहा कक्कड आणि तिचा बॉयफ्रेंड हिमांश कोहली उपस्थित होते.

  • Ekta Kapoor Troll for her Dress in Diwali Party
  • Ekta Kapoor Troll for her Dress in Diwali Party

Trending