आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर...वीजमंडळाच्या कर्मचाऱ्यांना 15000 दिवाळी बोनस, ऊर्जामंत्र्यांनी केली घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दिवाळीनिमित्त महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान अर्थात दिवाळी बोनस देण्याचा निर्णय राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. सर्व कर्मचारी संघटनांच्या उपस्थितीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

 

या तिन्ही कंपन्यातील विद्युत सहायक कर्मचार्‍यांना नऊ हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

 

ऊर्जामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एचएसबीसी फोर्ट येथे सानुग्रह अनुदानाबाबत बैठक झाली. यावेळी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन, सुत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

ऊर्जामंत्र्यांच्या घोषणेनंतर यावर सर्व संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे. बैठकीस महाराष्ट्र राज्य वीज तांत्रीक कामगार संघटनेचे संघटनेचे केंद्रिय अध्यक्ष एन.के.मगर, सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन, उपसरचिटणीस मनोज मोरे, प्रादेशिक पदाधिकरी बी.ए.साबळे व कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.


निर्णयाचे स्वागत...
उर्जामंत्री महोदयांनी जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानाचे स्वागत केल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब भाकरे यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष प्रवीण जठार, कोषाध्यक्ष ताराचंद कोल्हे, अध्यक्ष (निर्मिती) डी.एन.देवकते, अध्यक्ष (पारेषण) बाबाजी वाकडे, अध्यक्ष (वितरण) प्रभाकर लोखंडे, कार्याध्यक्ष (पारेषण) रोहिदास आल्हाट, उपसरचिटणीस आर.पी.थोरात, प्रकाश निकम, आत्माराम देशमुख, मुख्यालय प्रतिनिधी के.वाय.बगड आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...