आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानात महिलेने गोंडस मुलाला दिला जन्म..अबू धाबीहून जकार्ताला जात होते फ्लाइट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अबू धाबीहून जकार्ताला जाणार्‍या एतिहाद एअरवेजच्या विमानात एक महिला प्रसूत झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. या घटनेनंतर विमान मुंबई एअरपोर्टवर उतरविण्यात आले. एअरपोर्ट स्टॉफने तत्काळ महिला आणि नवजात शिशुला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बाळ आणि बाळंतीनची प्रकृती उत्तम असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

 

एअरपोर्ट प्रशासनाने दिलेली माहिती अशी की, विमानाने अबू धाबीहून उड्डाण घेतल्यानंतर एका महिला प्रवाशीला प्रसव वेदना सुरु झाल्या. काही वेळात तिने मुलाला जन्म दिला. या घटनेनंतर विमान मुंबई एअरपोर्टवर उतरविण्यात आले.
 
यापूर्वीही घडली होती अशी घटना...
जून 2018 मध्ये सौदी अरबहून कोची जाणार्‍या जेट एअरवेजच्या विमानात एक महिला प्रसूत झाली होती. अशीच एक घटना न्यूयॉर्कमध्येही समोर आली होती. भारतीय वंशाच्या एका अमेरिकन डॉक्टरने जमिनीपासून 35000 फूट उंचीवर उडणार्‍या विमानात महिलेची डिलिव्हरी केली होती.

बातम्या आणखी आहेत...