आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात भाजप आमदारावर खासगी कंपनीला 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप, गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश तिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांचे भाऊ चेतन तिळेकर आणि सहकारी गणेश कामठे यालाही आरोपी करण्‍यात आले आहे. तिघांनी एका खासगी कंपनीच्या संचालकांना त्यांच्या जागेत ऑप्टिकल फायबर टाकण्याच्या परवानगीसाठी 50 लाख रुपयांची खंडणी मागित‍ली होती.

 

इव्हिजिन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे एरिया मॅनेजर रवींद्र बर्‍हाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. 

 

आमदार तिळेकर यांनी आरोप फेटाळले...

आमदार योगेश तिळेकर यांनी इव्हिजिन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे आरोप फेटाळले आहेत. प्रतिमा मलीन करण्‍याच्या हेतूने हा कट रचण्यात आला आहे. 2019 च्या निवडणुकीपूर्वी काही लोक त्यांचे 22 वर्षांचे राजकीय करिअरला उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमदार या नात्याने हदसपूर क्षेत्रात अनेक विकास कामे केली आहेत. कोणत्याही व्यक्तीला आपण पैशाची मागणी केली नाही.

बातम्या आणखी आहेत...