Home | National | Madhya Pradesh | Fake Call Center In Bhopal, Six Arrested By Police

12 वी पास मुलांनी मित्रांसोबत मिळून 5,000 अमेरिकींकडून उकळले 70 कोटी रुपये..सहा जणांना अटक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 08, 2018, 07:56 PM IST

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे बनावट कॉल सेंटरवरून पाच हजार अमेरिकी नागरिकांकडून सुमारे 70 कोटी रुपये उकळण्यात आले.

 • Fake Call Center In Bhopal, Six Arrested By Police

  भोपाळ- मध्य प्रदेशातील भोपाळ येथे बनावट कॉल सेंटरवरून पाच हजार अमेरिकी नागरिकांकडून सुमारे 70 कोटी रुपये उकळण्यात आले. पोलिसांनी इंद्रपुरी भागात छापा टाकून सहा आरोपींना अटक केली. त्यांनी दिलेल्या कबुलीजबाबात ही माहिती उघड झाली आहे.

  महंमद फरहान (19), मौर्य श्रवणकुमार (19 रा. अहमदाबाद) शुभम गीते (19 रा. आमला), सौरव राजपूत (19 रा. विदिशा) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या टोळीचा एक सूत्रधार आरोपी अभिषेकने दिलेल्या माहितीवरून अहमदाबादहून वत्सल दीपेशभाई गांधी (25) यास अटक केली.

  दीपेशने अभिषेकला हा डाटा उपलब्ध करून दिला होता. या तरुणांनी बनावट कॉल सेंटर स्थापन करून अमेरिकेतील लोकांना कर्जाची तडजोड करण्यासाठी जाळ्यात ओढत होते. त्यांचा एक अमेरिकेतील साथीदार नागरिकांकडून दोन ते तीन हजार डॉलर इतकी रक्कम उकळत होता. आरोपी ही रक्कम बिटकॉइन, हवाला अथवा मनिग्राममार्फत अमेरिकींकडून मिळवत होता.

  सॉफ्टवेअरद्वारे गोळा केले परदेशी नागरिकांचे क्रमांक
  पोलिसांनी सांगितले, अहमदाबाद येथील एका कापड व्यापाऱ्याचा मुलगा अभिषेक पाठक व भोपाळचा रामपालसिंह (29) या बनावट कॉल सेंटरचे मास्टरमाइंड आहेत. गेल्या एक वर्षापासून कॉल सेंटर चालवत आहेत. त्याने इंजिनिअरिंगच्या अनेक विद्यार्थ्यांना नोकरीस ठेवले होते. अभिषेक 12 वी पास आहे. आरोपींनी आधुनिक सॉफ्टवेअरने अमेरिकेतील अनेक नागरिकांचे मोबाइल क्रमांक गोळा केले. 70 कोटींच्या फसवणुकीत टोळीला 20 लाखांचे कमिशन मिळाले.

  सरकारी अधिकारी म्हणून लोकांशी चर्चा करत
  अभिषेकने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, रामपालसोबत तो अहमदाबादच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होता. येथून त्यांना कर्ज उचलेल्या 12 लाख अमेरिकी नागरिकांचा डाटा मिळाला. दोघांनी अस्खलित इंग्रजीत सरकारी अधिकारी अशी ओळख करून देत असत. लोकांना कॉल करून कर्जाच्या तडजोडीसाठी बोलावून घेत. कर्जाची तडजोड करण्यापूर्वी वॉरंट व अटक करण्याची भीती दोघे अमेरिकी नागरिकांना दाखवत होते. अमेरिकेत असलेला मायकल डॅनियल बिटकॉइनद्वारे रक्कम वसूल करत होता. इतर लोकांना बनावट ई-मेलवर वॉरंट पाठवून दबाव आणत असत.

Trending