आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 वर्षे भामट्याला मुलगा समजून प्रेम देत होते आई-वडील..Youtube ने मिळवून दिला हरविलेला मुलगा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नरेंद्र अग्रवाल/शहजादा प्रिंस, सिमडेगा- आई-वडील 7 वर्षे मुलाला भरपूर प्रेम देतात. परंतु तो भामटा निघतो आणि यू-ट्यूबवर अपलोड व्हिडिओने 20 वर्षांपूर्वी हरविलेला मुलगा परत मिळतो..ही कहाणी तुम्हाला फिल्मी वाटली असेल. परंतु ही घटना सत्य आहे. सिमडेगा जिल्ह्यातील प्रखंडमधील बीरू बिंधाईनटोली गावातील नेलशन केरकेट्‌टा यांची 20 वर्षांपूर्वी  त्याच्या आई-वडिलांपासून ताटातूट झाली होती. तो सात वर्षांचा असताना त्याला मुंबईतील वेश्यावस्तीत विकले होते. तेथे तो घरकाम करत होता. त्याला फक्त आपले गाव बीरू आठवत होते.

 

नेलशन याच्या एका मित्राला यू-ट्यूबच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून बीरूच्या एका व्यक्तिचा पत्ता मिळाला. फोनवर संवाद साधला...नेलशनची कहाणी सांगितली. संबंधित व्यक्ती नेलशनचे वडील बेनेदिक केरकेट्‌टा यांच्या घरी गेला तेव्हा समजले की, एक भामटा मागील सात वर्षांपासून त्यांचा मुलगा बनून राहात आहे. सत्य समोर आल्यानंतर भामट्याने तेथून पळ काढला. अखेर 20 वर्षांपूर्वी नेलशनची शुक्रवारी आपल्या आई-वडिलांची भेट झाली.

 

7 वर्षांपासून भामटा मारत होता मज्जा...

सात वर्षांपूर्वी 20 वर्षीय एक तरुण नेलशन बनून बेनेदिक यांच्या घरी आला. स्वत:ला नेलशन सांगून बेनेदिक यांच्या घरी राहून लागला. संबंधित तरुणाची प्रत्येक इच्छा पूर्ण करत होता. त्यामुळे भामटा चांगलीच मज्जा मारत होता.

बातम्या आणखी आहेत...