आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारामतीचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दादा साळुंके यांची उजनी धरणाच्या पुलाखाली हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उसणवारी किंवा व्यावसायिक वादाचे कारण

बारामती-  पुणे-सोलापूर महामार्गावर भीमा नदीवरील पुलाखाली सापडलेला अनोळखी मृतदेह बारामती येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दादासाहेब गणपत साळुंके (३६) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी टेंभुर्णी पोलिसांना छिन्नविच्छिन्न मृतदेह सापडला होता. जवळ मोटारीच्या खूणा होत्या. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी रांझणी-भिमानगर चे पोलीस पाटील नवनाथ मदने यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

 

मृताच्या अंगावरील कपड्यांवर बारामतीच्या सिक्वेरा टेलर्सचा उल्लेख होता. त्यावरून टेंभुर्णी पोलिसांनी बारामती, इंदापूर या भागात मृताचे फोटो सोशल मीडियावरून प्रसिद्ध करून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा मृतदेह वंजारवाडी येथील दादा गणपत साळुंके यांचा असल्याचे निष्पन्न झाले. दादा साळुंके यांनी गुरुवारी रात्री 9.45  वा. पुणे सोलापूर रोडवर पळसदेव हद्दीत एका हॉटेलमध्ये जेवण केले. नंतर ते स्विफ्ट कारमधून  इंदापूरकडे निघाले होते. रात्री 10.02 वा. पत्नीने त्यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला होता. तो त्यांचा शेवटचा कॉल होता. अद्याप साळुंके याची स्विफ्ट कारही सापडलेली नाही.

 

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते
साळुंके राष्ट्रवादी काँग्रेस सेलच्या जनरल कामगार युनियनचे माजी अध्यक्ष होते. बारामती एमआयडीसीलगत वंजारवाडी येथील ते रहिवासी आहेत. त्यांच्या आईने यापूर्वी वंजारवाडीच्या सरपंच-उपसरपंचपदाची जबाबदारी सांभाळली आहे. साळुंके यांचा एमआयडीसीत गौरव वॉटर सप्लायर्स हा व्यवसाय आहे. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास शोकाकूल वातावरणात साळुंके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या खुनाच्या तपासासाठी टेंभुर्णी पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत.

बातम्या आणखी आहेत...