आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरांसाठी गवत कापण्यासाठी शेतात गेला होता शेतकरी..अचानक सर्पाने केला दंश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- तालुक्यातील शिरसाड येथे एका 52 वर्षीय शेतकर्‍याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी घडली. गोकुळ काशिनाथ अलकरी–राजपूत असे मृत शेतकर्‍याचे आहे. स्वत:च्या शेतात गवत कापताना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांना सर्पदंश झाला.

 

शिरसाड येथील शेतशिवारात गोकुळ अलकरी यांची शेती आहे. त्या शेतात गुरूवारी सकाळी ते गुरा-ढोरांकरीता गवत आणण्याकरीता गेले होते. दरम्यान, गवत कापताना त्यांच्या हाताला सापने चावा घेतला. ते तत्काळ घरी परतले. साकळी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार घेतले. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले. येथे डॉ.अमीर तडवी, सरला परदेशी, पिंटू बागूल यांनी उपचार सुरू केले मात्र, उपचारादरम्यान गोकुळ अलकरी यांचा मृत्यू झाला.

 

याप्रकरणी यावल पोलिसांत जितेंद्र प्रकाश अलकारी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार युनूस तडवी तपास करीत आहे. सर्पदंशाने शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याने शिरसाडसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो

बातम्या आणखी आहेत...