आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावचे माजी खासदार वाय.जी. महाजन यांचे निधन, 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- माजी खासदार यशवंत गिरधर महाजन (वाय. जी. महाजन सर) यांचे सोमवारी दुपारी अडीच वाजता निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात महाजन सरांवर उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालविली. सायंकाळी साडेपाच वाजता नशिराबाद येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्‍यात येणार आहेत.

 

मागील काही दिवसांपूर्वी महाजन यांची प्रकृती खालावली होती. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते.

 

पुणे विद्यापीठातून बी.एड. केलेले महाजन सर हे व्यवसायाने शिक्षक आहेत. भारतीय जनता पक्षाकडून जळगांव लोकसभा मतदारसंघातून 1999 मध्ये आणि 2004 मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणीक प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी नशिराबाद येथ शिक्षण संस्थाही सुरु केली होती.

बातम्या आणखी आहेत...