माढ्यातील वडाची वाडीच्या / माढ्यातील वडाची वाडीच्या शेतकर्‍याच्या मुलाने शेतात बसून लिहिले स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तक

संदीप शिंदे

Nov 08,2018 01:49:00 PM IST

माढा (सोलापूर)- वडाची वाडी (उ.बृ) येथील शेतकर्‍याच्या मुलाने स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे कृषीशास्त्र (कृषीविषयक घटक) पुस्तक लिहिले आहे. रामचंद्र दतात्रय कवले (24) असे या तरुण लेखकाचे नाव आहे. रामचंद्रचे आई-वडील काबाड कष्ट करतात. शेतात काळ्या आईची सेवा करतात. रामचंद्र याने शेतात बसून कृषीशास्त्र हे पुस्तक लिहिले आहे. यासाठीला दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठातील प्रा. डॉ. सागर मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. रामचंद्र याला पुस्तक लिहिण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला.

शेतात प्रकाशन सोहळा..

रामचंद्र कवले लिखित या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे रामचंद्र यांनी हा सोहळा शेतात ठेवला आहे. प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहाणार आहेत.


रामचंद्र स्वत: स्पर्धा प‍रीक्षेची तयारी करत आहे. रामचंद्र विज्ञान आणि कला शाखेत पदवीधर आहे. रामचंद्र याने लिहिलेल्या 248 पानी पुस्तकात विविध अधिकृत संदर्भाचा आधार घेण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने योग्य रचना व मांडणी करण्‍यात आली आहे. विशेष म्हणजे रामचंद्र यानेळ शेतातील काळ्या मातीत बसून हे पुस्तक लिहिले आहे. रामंचद्रचे सर्वत्र कौतुक होत असल्याने त्याचे आई-वडील आनंदाने भारावून गेले आहेत.

एमपीएससीसह इतर स्पर्धा परीक्षा देणार्‍या तरुणासाठी हे पुस्तक मी लिहिले आहे. स्वत: शेतकरी कुटुंबात जन्म घेतल्याने आई-वडिलांसोबत शेती जीवन अनुभवले आहे. तरुणांना समजेल अशा सोप्या भाषेत हे पुस्तक लिहिले आहे.
- रामचंद्र दतात्रय कवले, तरुण लेखक


रामचंद्रने पुस्तक लिहिण्याची इच्छा माझ्याजवळ व्यक्त केली होती. त्यानुसार मी त्याला मार्गदर्शन केले. कोकण कृषी विद्यापीठात माझ्याकडे सातत्याने येत होता. मार्गदर्शन घेत होता. त्याचे हे पुस्तक निश्चितच दिशादर्शक ठरेल.

- प्रा.डॉ.सागर मोरे, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

कृषीशास्र पुस्तक स्पर्धा परीक्षेकरिता फायदेशीर ठरणार आहे. हे पुस्तक मी कुरीअरने मागवले आहे. सोप्या पद्धतीने यात मांडणी केली आहे.
-सचिन सुरवसे, स्पर्धा परीक्षा अभ्यासक, पुणे

X
COMMENT