आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाज विधिमंडळावर धडकणार 30 हजार शेतकरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शेतकरी- अादिवासींच्या मागण्यांकडे फडणवीस सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संघर्ष समितीने पुन्हा एल्गार पुकारला अाहे. राज्यभरातील ३० हजार अादिवासी व शेतकरी बुधवारी ठाण्यात एकत्र जमले. येथून या अांदाेलकांनी पायी माेर्चा काढला असून गुरुवारी ते मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनावर धडक देणार अाहेत.

  

यापूर्वी शेतकरी व अादिवासी संघटनांनी एकत्र येत सरकारविराेधात मार्च महिन्यात नाशिक ते मुंबई असा पायी माेर्चा काढला हाेता. यात ४० हजार अांदाेलक सहभागी झाले हाेते.  त्या वेळी दिलेल्या अाश्वासनांची पूर्ती सरकारने केली नसल्याचा संघटनांचा अाराेप अाहे. त्यामुळे अाता शेतकरी व अादिवासी लाेकसंघर्ष समितीच्या माध्यमातून हे अांदाेलन केले जात अाहे.

 

या अांदाेलनासाठी मंगळवारपासूनच ठाण्यात राज्यभरातील शेतकरी व अादिवासी बांधव जमा झाले हाेते. गुरुवारी हा माेर्चा अाझाद मैदानावर धडकणार अाहे. तसेच विधान भवनाला घेराव घालण्याचा इशाराही देण्यात अाला अाहे. ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह व स्वराज अभियानाचे प्रमुख याेगेंद्र यादव यांच्यासह अनेक शेतकरी, अादिवासी नेते गुरुवारी या माेर्चात सहभागी हाेणार अाहेत. हे दाेन्ही नेते २९ नाेव्हेंबर राेजी दिल्लीत हाेणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी संमेलनाचे नेतृत्व करत अाहेत.  राज्यात यंदा दुष्काळाचे चटके बसत अाहेत. या पार्श्वभूमीवर तरी सरकारने तातडीने शेतकरी व अादिवासींना मदत जाहीर करावी, अशी अांदाेलकांची मागणी अाहे.

बातम्या आणखी आहेत...