आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमारचा सिनेमा \'हाऊसफुल-4\'च्या सेटवर महिला डान्सरसोबत छेडछाड..चुकीच्या ठिकाणी केला स्पर्श

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अक्षय कुमारचा सिनेमा 'हाऊसफूल-4'च्या शूटिंगदरम्यान महिला डान्सरची छेडछाड करण्यात आल्याचे समोर आले आहे. गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला. हाऊसफूल-4 ची शूटिंग चित्रकुट स्टूडिओमध्ये सुुरु आहे. स्टूडिओमध्ये अचानक काही लोक घुसले. त्यांनी जबरदस्ती करण्‍याचा प्रयत्न केला. तिला टोळक्याने मागून मागून उचलले आणि चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला, असे पीडित महिला डान्सरने पोलिस तक्रारीत म्हटले आहे.

 

ही घटना घडली तेव्हा अक्षय कुमार, बॉबी देओल आणि रितेश देशमुख आदी यावेळी स्टूडिओमध्ये उपस्थित होते. घटनेनंतर 100 हून अधिक डान्सर पोलिस स्टेशनला पोहोचले. त्यांनी प्रचंड गदारोळ केला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पवन शेट्टी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

वादाच्या भोवर्‍यात सापडलाय सिनेमा...

हाऊसफूल-4 हा सिनेमा सुरुवातीपासून वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. ज्येष्ठ अ‍भिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्याचबरोबर सिनेमाचे दिग्दर्शक साजिद खानवर देखील बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. यावरून अक्षय कुमार यांनी आरोप झालेल्या व्यक्तिंसोबत काम करण्यात नकार दिला होता. त्यानंतर साजिद खान आणि नाना पाटेकर या दोघांनी 'हाऊसफुल-4' सोडला होता.

बातम्या आणखी आहेत...