आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला डॉक्टरने आठ मजली इमारतीवरून उडी घेऊन केली आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कल्याणमध्ये एका महिला डॉक्टरने आठ मजली इमारतीलवरून उडी घेऊन आत्महत्या केली. महिलेने आत्‍महत्‍या करण्या मागील कारण समजू शकले नाही. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्‍टमॉर्टमसाठी पाठविला आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, प्राजक्ता कुलकर्णी असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. कल्याणमधील खडकपाडा परिसरातील महावीर हाइट्स बिल्डिंगमध्ये त्या राहत होत्या. प्राजक्ता यांचे पती पवन हे देखील डॉक्टर आहेत. इमारतीवरून उडी घेतल्यानंतर सुरक्षा गार्ड आणि शेजारच्यांनी प्राजक्ता यांना हॉस्पिटलमध्ये हलविले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. पोलिस प्राजक्ता यांच्या पतीचीही चौकशी करत आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...