आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत 18 मजली इमारतीला भीषण आग; वयोवृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू, 19 जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 19 जण गंभीररित्या भाजले गेले

मुंबई- अशोका सम्राट परिसरात रविवारी 18 मजली इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीत वयोवृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला. तर 19 जण गंभीररित्या भाजले गेले आहेत. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी इमारतीत अडकलेल्या 50जणांना सुरक्षित बाहेर काढले.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 70 वर्षीय महिला लक्ष्मीबाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी पहाटे इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर आग लागली होती. त्यानंतर मजल्यावरील सर्व फ्लॅटमध्ये ही आग पसरली.

 

96 जण अडकले होते...

अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, तिसर्‍या मजल्यावर 96 जण अडकले होते. भीषण आगीमुळे लोकांना बाहेर निघणे अवघड झाले होते.  अग्निशमन दलाच्या जवानांनी साडेतीन वाजता बचाव कार्य सुरु केले. सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...