आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात एकाच दिवसात 3 गोळीबार; महिला ठार...पाठलाग करणाऱ्या पाेलिसावरही झाडली गाेळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - बुधवारी दिवसभरात पुण्यात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या. त्यापैकी एका घटनेत महिलेचा मृत्यू झाला, तर तिच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपीला पकडण्याच्या तयारीत असतानाच त्याने केलेल्या गोळीबारात पोलिस निरीक्षक जखमी झाले. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. जखमी झालेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. चंदननगर परिसरातील आनंद पार्क येथील इंद्रायणी गृहरचना सोसायटीत भाटी कुटुंब वास्तव्यास आहे. घरात ब्रिजेश भाटी, त्यांची पत्नी एकता, वडील आणि दोन मुले राहायचे.  

 

दोन वर्षांपूर्वीच ते येथे स्थायिक झाले. एकता भाटी या आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना डबे पुरवायच्या. यासाठी त्यांनी एका इमारतीतील ३ सदनिका भाड्याने घेतल्या आहेत.  बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास तळमजल्यावर राहणाऱ्या सासऱ्यांनी त्यांना चहा पिण्यासाठी बोलावले होते. या वेळी प्रथम ब्रिजेश खाली गेले होते. यानंतर एकता थोड्या वेळाने खाली जात होत्या. तितक्यात जिन्यातच २ मारेकऱ्यांनी तिच्यावर गोळीबार केला आणि फरार झाले. दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीस ब्रिजेशने उचलून रुग्णालयात नेले. मात्र, एकताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

 

गोळी झाडणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात
एकताला मारणाऱ्या संशयितांची माहिती पोलिसांना मिळाली. ते पुणे रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन पवार यांना समजली. पवार यांच्या पथकाने रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला. त्याच वेळी संशयितांनी अचानक गोळीबार केला व त्यात पवार जखमी झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून प्रकृती स्थिर आहे. आरपीएफने एकाला अटक केली, तर दुसरा पिस्तुलासह पसार झाला. तो मालधक्का चौकातून पिस्तूल घेऊन पळत जात असताना तिथे तैनात वाहतूक शाखेचे पोलिस शिपाई राजेश शेळके यांनी पाहिले. आरोपी एका इमारतीत घुसला. त्याने हवेत गोळीवर केला. ही घटना नागरिकांना हाती दगड घेत आरोपीवर हल्ला चढवला. इमारतीबाहेर पडता न आल्याने आरोपीने एका पत्र्याच्या शेडवर उडी मारली. चिडलेल्या नागरिकांनी त्याला दगड मारून जखमी केले. शेवटी शेळकेंनी त्यावर झडप टाकून त्यास पकडले.

 

सराफा दुकानावर दरोड्याचा प्रयत्न, व्यावसायिकावर झाडल्या गोळ्या   
काेंढवा परिसरातील येवलेवाडी येथे बुधवारी दुपारी पावणेदाेन वाजेच्या सुमारास एका सराफा व्यावसायिकाच्या दुकानात दराेड्याच्या उद्देशाने शिरलेल्या चौघांनी गाेळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत गणेश ज्वेलर्समधील अमित परिहार (३०) हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू अाहे. बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे अमित दुकानात काम करत असताना हे चौघे हल्लेखाेर दुकानात शिरले. त्यांनी कामगारास दागिने दाखवण्याच्या बहाण्याने बाेलण्यात गुंतवून ठेवले. तितक्यात दोघांनी बॅगेतून पिस्तूल काढून दुकानदारावर गाेळीबार केला आणि काउंटरच्या काचेची तोडफोड करत पसार झाले. संबंधित घटना दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून त्याअाधारे पाेलिस हल्लेखाेरांचा शाेध घेत अाहेत.   

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. घटनेचे फोटो आणि संबंधित व्हिडीओ..

 

बातम्या आणखी आहेत...