आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदा कॅमेर्‍यात कैद झाली लेडी स्टंटबाज; रेल्वे पोलिस घेत आहेत शोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लोकल ट्रेनच्या दरवाज्यावर लटकून स्टंटबाजी करणार्‍या तरुणांना याआधी तुम्ही पाहिले असेल. मात्र, पहिल्यांदा एक लेडी स्टंटबाज कॅमेर्‍यात कैद झाली आहे. जिवाची पर्वा न करता ती धावत्या ट्रेनच्या दरवाज्याला लटकून स्टंट करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. लेडी स्टंटबाजचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेल्वे पोलिस या लेडी स्टंटबाजचा शोध घेत आहेत.

 

मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी (30 ऑगस्ट) रात्री हार्बर मार्गावर रे-रोडहून प्रथम श्रेणीच्या डब्यात एक महिला प्रवास करत होती. संपूर्ण डबा रिकामा असता सीटवर न बसता ही महिला दरवाज्याला लटकून स्टंटबाजी करत होती.
 
प्रतिदिवशी 8 जणांचा होतो मृत्यू:
रेल्वे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दरवर्षी रेल्वे खाली येऊन 3000 हून जास्त लोकांचा मृत्यू होतो. याचा अर्थ असा की, प्रतिदिवशी 8 जणांचा मृत्यू होतो.

बातम्या आणखी आहेत...