आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या 12 तासांत पाच आरोपींसह सव्वा कोटी रूपये जप्त; पोलिसांची धडक कारवाई, महासंचालकांनी केले कौतुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- पिंपळनेर रस्त्यावरील नवापूर तालुक्यातील रायपूर जामतलाव दरम्यान गुरूवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास रिव्हॉल्व्हर व चाकू धाक दाखवून धाक दाखवत 2 कोटी 41 लाख 50 हजारांची लुट झाल्याची घटना घडली होती. अवघ्या 12 तासात पोलिस अधीक्षक संजय पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या पथकाने गुजरात राज्यातील म्हैसाना शहरातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून एक कोटी 22 लाख 27 हजार 500 रूपये जप्त केले. पोलिसांनी पाच आरोपी ताब्यात घेतले आहे.


नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्या या कामगिरीचे कौतुक नाशिक पोलिस महासंचालक यांनी केले.

इन्वोव्हा गाडी (क्र. जीजे 05 सीएल 2243) मध्ये एक एअर गेन, एक बंदुक, तीन चाकू सापडले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील आतापर्यंत सर्वात मोठी लूट होती. त्याचा तपास अवघ्या 12 तासात लागल्याने पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

2 कोटी 41 लाख 50 हजार पैकी 1 कोटी 22 लाख 26 हजार 500 रूपये गुजरात राज्यातील पाच आरोपीकडून मिळाले 90 लाख सहाव्या आरोपीकडे असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. 13 लाख 50 हजार टाटा सफारी मालकाला मिळाले. 16 लाख रुपयांचा शोध पोलिस घेत आहेत. इन्वोव्हा गाडीत एक एअर गेन, एक पिस्तूल, तीन चाकू मिळाल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय पाटील यांनी दिली आहे.

 

पटेल राजेश कानाजी (लखपत, कच्छ), अमरली चैनाजी ठाकूर (महापूर, मैहसणा),
अक्षय शैलेश पटेल (राजगड, म्हैसाना), प्रकाश शांतीलाल पटेल (कनेसरा, शिंमपूर, पाटण),
दीपककुमार हसमुख पटेल (लक्ष्मीपूरा, उमाजी) अशी आरोपींची नावे आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...