आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी बस व बोलोरोचा भीषण अपघात; विसर्जन मिरवणुकीसाठी जाणारे ५ वाजंत्री ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिबी- भरधाव जाणाऱ्या खासगी लक्झरी बसची व गणेश विसर्जनासाठी जाणाऱ्या बँड पथकाच्या बोलेरोची समोरासमोर धडक होऊन बँड पथकातील ५ जण जागीच ठार झाले. तर १३ जण जखमी झाले आहेत. ही घटना २३ सप्टेंबरच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास औरंगाबाद ते मेहकर महामार्गावर घडली. 


या अपघातात बँड पथकातील पाच सदस्यांचा जागीच मृत्यू झाला तर तेरा जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी नऊ जणांची प्रकृती चिंताजनक असून जखमींना तातडीने उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले आहे. तर जखमी चार जणांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतकामध्ये ज्ञानेश्वर वामन डोंगरे रा. लिंगा पेन ता. रिसोड, अरुण संजय कांबळे रा. भर जहागीर, राजू भगवान कांबळे रा. भर जहागीर, प्रवीण दशरथ कांबळे रा.शिरपूर जैन, गणेश सदाशिव बांगर रा. शिरपूर जैन यांचा समावेश आहे. तर जखमी मध्ये ज्ञानेश्वर प्रल्हाद उबाळे, राजू आश्रू कांबळे, नितीन राजेश आठवले रा. भर जहागीर, दगडू गंगाराम कांबळे, प्रवीण गंगाराम कांबळे, सज्जन आश्रू आढाव, विशाल आश्रू आढाव, संजय भगवान कांबळे, आकाश आत्माराम पारवे, मंगेश शिवाजी पारवे, दुर्गादास शिवाजी पारवे रा. लोणी, किशोर शेषराव जोगदंड रा. कापडसिंगी जिल्हा हिंगोली, ज्ञानेश्वर चिनकू आढाव हे जखमी झाले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...