आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: कुलाब्याच्या प्रतिष्ठित शाळेतील आठवीत शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनी बेपत्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कुलाब्यातील एका प्रतिष्‍ठित शाळेतील आठवीत शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनी शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता आहेत. कुलाबा पोलिसांची विविध पथके या बेपत्ता विद्यार्थिनींचा शोध घेत आहेत.

 

मिळालेल्या माहिती अशी की, शुक्रवारी विद्यार्थिनींचा 'ओपन डे' म्हणजे परीक्षेचा निकाल होता. त्यात मुलींना परीक्षेत गुण कमी मिळाल्याने त्या नाराज झाल्या. शाळा दुपारी अडीच वाजता सुटते, मात्र शाळा सुटल्यानंतरही मुली घरी परतल्या नाहीत.

 

संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांनी थेट शाळेत संपर्क केला. मात्र, मुलींबाबत काहीच माहिती मिळाली नाही. नंतर पालकांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. बेपत्ता मुलींचे पालक आणि नातेवाईकांनी कुलाबा पोलिस स्टेशनबाहेर रात्रभर गर्दी केली होती.

बातम्या आणखी आहेत...