आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्हातील वांगी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मटकीतून 114 विद्यार्थ्यांना विषबाधा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- मध्यान्ह भोजनासाठी दिलेल्या मटकीच्या उसळीतून ११४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना बीड तालुक्यातील वांगी येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. विद्यार्थ्यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. 


बीड तालुक्यातील वांगी गावात जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतची प्राथमिक शाळा अाहे. या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या १४६ आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजता १३४ विद्यार्थ्यांना मटकीची उसळ देण्यात आली. उसळ खाताच विद्यार्थ्यांना उलट्या व चक्कर येणे सुरू झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी ११४ जणांना बीड जिल्हा रूग्णालयात दाखल केले. सायंकाळी साडेसहा वाजता उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने काही जणांना घरी पाठवण्यात आल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...