आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपी आणि उत्तराखंडचे माजी मुख्‍यमंत्री एनडी तिवारी यांचे निधन..वाढदिवशीच घेतला अखेरचा श्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-  उत्तर प्रदेशचे तीन वेळेचे मुख्यमंत्री आणि उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते नारायण दत्त तिवारी (94) यांचे गुरुवारी निधन झाले. गुरुवारीच त्यांचा 93 वा वाढदिवस होता. ब्रेन स्ट्रोकमुळे गतवर्षी सप्टेंबरमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

डॉक्टरांनुसार, हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. उतरत्या काळात तिवारींना आंध्र प्रदेशचे राज्यपालपद देण्यात आले होते. 2009 मध्ये त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत होते. या सेक्स स्कँडलमध्ये अडकल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. 1995 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून काँग्रेस (तिवारी) हा नवीन पक्ष स्थापन केला होता.

 

88 व्या वर्षी दुसरे लग्न :
प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर 2013 मध्ये रोहित शेखरला त्यांनी आपला पुत्र मानले होते. त्याची आई उज्ज्वला सिंहसोबत त्यांनी 2014 मध्ये वयाच्या 88 व्या वर्षी दुसरे लग्न केले होते.

 

तिवारी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1925 रोजी नैनीतालमधील बलौटी गावात झाला होता.  अलाहाबाद विद्यापीठात त्यांनी राज्यशास्त्र विषयात उच्चशिक्षण घेतले होते. तसेच त्यांनी कायद्याचेही शिक्षण घेतले होते. 1947 मध्ये अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी तिवारी यांची निवड झाली होती. 1947 ते 1949 या काळात त्यांनी ऑल इंडिया स्टूडेंट काँग्रेसचे सचिवपद भूषविले होते.

बातम्या आणखी आहेत...