आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल-भुसावळ रस्त्या बनला मृत्यूचा सापळा..खड्ड्यामुळे दोन दिवसांत चार अपघात, चार गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- भुसावळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे दोन दिवसांत चार अपघात झाले आहेत. या अपघातात चार गंभीर जखमी अपघाताचा सापळा बनत चालला आहे. शुक्रवारी तीन दुचाकींच्या अपघातानंतर शनीवारी (दि.22) खड्डे चुकवतांना दोन ट्रक समोरा–समोर धडकल्या. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले तर या अपघातात यावल- भुसावळ रस्ताच बंद पडला आहे.

 

एसटी व खासगी वाहतुक तब्बल सहा तासांपासून भालोद-बामणोद व बोरावल–टाकरखेडामार्गे भुसावळ अशी वळवण्यात आली आहेत. रस्त्याच्या परिस्थितीमुळे उद्‍भवणाऱ्या अपघातामुळे नागरीकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

यावल ते भुसावळ रस्ता गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत तर या खड्ड्यांना चुकवतांना या रस्त्यावर अपघात नित्याचे झाले आहेत. शुक्रवारी खड्डे चुकवतांना तीन दुचाकींचा अपघात झाला होता. त्यात पाच जण जखमी झाले होते तर त्यातील दोन गंभीर आहे. शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास एम.एच. ४८ टी. ४३६५ टँकर हे यावलकडून भुसावळकडे जात होते तर ट्रक क्रमांक आर. जे. ०२ जी.ए. ९१६० हे भुसावळकडून यावलकडे येत होते दरम्यान निमगाव जवळील पुलावर खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात दोन्ही ट्रक समोरासमोर धडकल्या. त्यात दोन्ही वाहनांचे चालक ब्रिजेशकुमार सरोज (वय 45) व अर्जुनसिंग भानुसिंग राजपुत (वय ३७, रा. सिंकर, राजस्थान) गंभीर जखमी झाले अपघातामुळे दोन्ही वाहनांना रस्ता बंद झाला तर जखमींना घटनास्थळावरून डॉ. उमेश कवडीवाले, चंद्रकांत ठोके यांनी यावल ग्रामीण रूग्णालयात आणले. येथे डॉ. यांनी प्रथमोपचार करीत दोघांना जळगाव येथे शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचार्थ हलवण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातस्थळी सहाय्यक फौजदार नागपाल भास्कर, गृह सुरक्षा दलाचे कर्मचारी विजय जावरे, एम. बी. पारधे, चेतन वारूळकर, एस. बी.येऊल, राजु लाळ, बालू भांबरे या कर्मचाऱ्यांनी रस्ता मोकळा करण्याकरीता परिश्रम घेत आहे.

 

एसटीबस व खासगी वाहने इतर मार्गाने वळवले...
या अपघातामुळे सकाळपासून यावल-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल सहा तासांपासून ठप्प असलेल्या वाहतुकीमुळे काही वाहतूक व एसटी बसेस भालोद–बामणोदमार्गे तर काही बोरावल, टाकरखेडामार्गे भुसावळ अशी वळवण्यात आली होती.

 

नागरीकांमध्ये संताप...

भुसावळ रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली असून रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. तेव्हा हा रस्ता अपघाताचा सापळा बनत चालला आहे. रस्त्याच्या या अवस्थेबद्दल नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. रस्ता दुरूस्तीची मागणी करण्यात आली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...खड्ड्यामुळे दोन दिवसांत झालेल्या चार अपघातांचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...