आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकत्रच निघाली 4 बेस्ट फ्रेंडची अंत्ययात्रा..संपूर्ण गावावर कोसळला दु:खाचा डोंगर, एकाही घरात पेटली नाही चूल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीकमगड (एमपी)- जिल्ह्यातील मोहनगडमधील देवराई मंदिराजवळी रतन तळ्यात बुधवारी 4 मुलांचा बुडून मृत्यू झाला. चौघे बालमित्र होते. चौघांची एकत्र अंत्ययात्राकडून एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावातील एकाची घरात चूल पेटली नाही. अतूट मैत्रीमुळे चौघे मुले स्मरणात राहातील. मृत्यूही ‍त्यांना विभक्त करू शकला नाही.

 

चौघे एकत्रच जात होती शाळेत...

चौघे चांगले मित्र होते. सोबतच कोचिंग आणि शाळेत जायचे. एवढेच नाही तर कुठे फिलायला जातानाही सोबतच निघायचे. मात्र, त्यांना काय माहीत होते, की त्यांचा मृत्यूही सोबतच होईल.

 

सोबत गेले पिकनिकला मात्र, परत आले नाही..

विजय समेले (13), निखिल जैन (13), निक्की मिश्रा (14) आणि आभाष चतुर्वेदी (15) हे चौघे बुधवारी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या देवराई मंदिरावर पिकनिकला गेले होते.  चौघे मंदिराजवळील तळ्यात अंघोळीसाठी उतरले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडून मृत्यू झाला.

 

चौघांमध्ये होती अतुट मैत्री..

गोरगाव येथील राहाणारे विजय समेले, निखिल जैन, निक्की मिश्रा आणि आभाष चतुर्वेदी या चौघांची मैत्री परिसरातील लोकांच्या कायम स्मरणात राहील. चौघेही रवींद्र मेमोरियल स्कूलमध्ये शिक्षण घेत होते. एके दिवशी निक्की मिश्राच्या आई-वडीलांनी त्याचे शाळेतून नाव काढून हायर सेंकंडरी स्कूलमध्ये त्याचे अॅडमिशन घेतले. त्यानंतर उर्वरित तिघांनीही शाळेतून नाव काढून निक्कीच्या शाळेत अॅडमिशन घेतले.

बातम्या आणखी आहेत...