आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव स्कूलबसमधून पडले 4 विद्यार्थी, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल, क्षमता नसतानाही कोबंले होते 120

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शांताबाई विद्यालयाची ही बस असल्याचे समजते.

औरंगाबाद- भरधाव स्कूलबसमधून पडून 4 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी छावणी परिसरात घडली. बस धावतांना खिडकीची काच फुटली आणि चार विद्यार्थी बसमधून खाली पडली. रस्त्यावरील लोकांनी ही बाब बस चालकाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याने बस थांबविली.

 

चारही विद्यार्थ्यांना गंभीर जखमी अवस्थेत शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. छावणी परिसरातील शांताबाई विद्यालयाची ही बस असल्याचे समजते. लसीकरणासाठी विद्यार्थी जात असताना ही घटना घडली.

 

क्षमता नसतानाही बसमध्ये कोंबले 120 विद्यार्थी..

साधारणत: स्कूल बसची आसण क्षमता 50 ते 55 असते. मात्र, या बसमध्ये 120 विद्यार्थ्यांना बसविल्याचे समोर आले आहे.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..

बातम्या आणखी आहेत...