आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघरमध्ये समुद्रमार्गे 4 संशयित शिरल्याचा संशय; बोईसरमध्ये जिलेटिनच्या 350 कांड्या आढळल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पालघर समुद्रकिनाऱ्यावरून चार संशयीत शिरल्याची माहिती समोर आली आहे. चारही जण बोटीतून समुद्रमार्गे उतरले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. यामुळे पालघरसह परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरू केले असता पालघर जिल्ह्यातील बोईसर (पूर्व) मधील नागझरी येथील एका घरात जिलेटिनच्या 350 कांड्या आढळून आल्या आहेत. बेकायदेशीर स्फोटकांचा साठा करणाऱ्यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.

 

गोठ्यात लपवून ठेवल्या होत्या ‍जिलेटिनच्या कांड्या..

नागझरी येथे घरात बेकायदेशीरपणे जिलेटीनचा साठा असल्याची माहिती पालघर गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांनी केलेल्या छापेमारीत घराच्या बाजुला असलेल्या गोठ्यात 2 बॉक्समध्ये सुमारे 350 जिलेटीन कांड्या सापडल्या आहेत. या कारवाईमुळे पालघर परिसरात भीतीचे वातावरण आहे.

 

4 संशयीत शिरले..

पालघरमधील घोलवड पोलिस स्टेशन परिसरात 4 संशयीत शिरल्याची माहिती समोर आली आहे. बोटीतून समुद्रमार्गी हे चारही संशयीत उतरल्याने स्थानिकांनी पाहिल्याचे सांगितले.  याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर हे चार व्यक्ती कोण आहे याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी परीसरात कोंबिंग ऑपरेशन हाती घेतले असून शोधकार्य सुरू आहे.

 

बातम्या आणखी आहेत...