आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपळनेर येथे फर्निचर शोरूमला भीषण आग; 50 लाखांचे फर्निचर जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळनेर- सटाणा रोडवर असलेल्या जावीद फर्निचर शोरूमला बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत पलंग, सोपासेट, खुर्च्या, शोकेस कपाट, लाकडी फर्निचर, लाकूड कटर मशीन, सायकल, खिडक्या, दरवाजे, विविध हत्यारे जळून झाले आहेत. या भीषण आगीत जवळपास पन्नास लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. अल्ताफ सय्यद यांच्या मातोश्री नमाज पठणासाठी पहाटे उठल्या असता त्यांना दुकानात आग लागल्याचे दिसले. त्यांनी याबाबत कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली. घटनेनंतर हाकेच्या अंतरावर असलेल्या घटनास्थळी अग्निशमन दलाची वाहन पोहोचण्यास निलंब झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.

 

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. फायर ब्रिगेड दाखल होऊनही जवानांना योग्यप्रकारे प्रशिक्षण नसल्याने त्यांना वाहन ऑपरेट करता आले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 

पिंपळनेरमधील नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करून भीषण आगीवर नियंत्रण मिळविले. दिग्विजय अहिरराव या तरुणाने आपले कौशल्य दाखवून संपूर्ण अग्निशमन दलाची गाडी हाताळली. आग विझविण्याच्या कामात मदत केली. दिग्विजय हा पुणे येथे मुख्य अग्निशमन अधिकारी आहे. यावेळी काही पोलिस कर्मचाऱ्यांना दुखापतही झाली व अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

 

भीषण आगीच्या घटनेनंतर नागरिकांनी पिंपळनेर शहरात स्वतंत्र अग्निशमन दलाचे वाहन द्यावे, अशी मागणी केली. काही वर्षांपूर्वी पिंपळनेर शहरात यात्रेच्या दरम्यान गॅस टँकरही पलटी झाले होते. त्यावेळी अग्निशमन दलास पोहोचण्यास वेळ लागला होता. भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने योग्य दखल घेऊन पिंपळनेर शहरात एक अग्निशमन दलाची गाडी उपलब्ध करून देणे अत्यावश्यक झाले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. आगीची भीषणता दर्शविणारे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...