Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Gairan land issue Clashes in Ahmednagar between 2 groups 1 died 11 injured

गायरान जमिनीच्या वादातून नगरमध्ये हाणामारी, हाणामारी दरम्यान एकाचा मृत्यू तर 11 जखमी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 30, 2018, 12:39 PM IST

गायरान जमिनीच्या वादातून पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपरी येथे दोन गटात झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी

  • Gairan land issue Clashes in Ahmednagar between 2 groups 1 died 11 injured

    अहमदनगर- गायरान जमिनीच्या वादातून पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपरी येथे दोन गटात झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी 51 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहिती अशी की, कळसपिंपरी गावात अनेक वर्षांपासून गायरान जमीन होती. या जमिनीत कंस पवार यांचे कुटंब शेती करत होते. मात्र, या जमिनीवर जलसंधारणाचे काम करण्याचा निर्णय गावकर्‍यांनी घेतला. ग्रामस्थांनी या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी पाथर्डी पोलिस ठाण्यात अर्ज दिला केला. मात्र, पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने गावकऱ्यांनी गायरान जमिनीवर थेट जेसीबी फिरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिकवलेली शेती उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी पवार कुटुंबीयांनी गावकर्‍यांना विरोध केला. यावरून पवार कुटुंब आणि गावकऱ्यांमध्ये वाद वाढला. नंतर या वादाचे पर्यवसन तुंबड हाणामारीत झाले. यात मारहाणीत 12 जण जखमी झाले. गंभीर जखमी झालेले कंस पवार यांचा उपचारादरम्यान अहमदनगर जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

    51 जणांविरोधात गुन्हा दाखल..

    पवार कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पाथर्डी पोलिस स्टेशनला 51 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

Trending