आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाडीत शिकणार्‍या मुलीवर बलात्कार, उपराचाराआधीच मालवली पीडितेची प्राणज्योत; नगर जिल्ह्यातील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुग्णालयाबाहेर मोठा फोजफाटा तैनात
  • पीडित मुलगी गावातील अंगणवाडीत शिकत होती

नगर- पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पीडित चिमुरडीला नातेवाईकांनी तातडीने साखर कामगार रुग्णालयात हलविले मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले.

 

या घटनेचे वृत्त पसरताच सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. काही काळ तणावही निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत रुग्णालयाबाहेर मोठा फोजफाटा तैनात करण्‍यात आला आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, कारेगाव येथे शनिवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. पीडित मुलगी गावातील अंगणवाडीत शिकत होती. तिचे आई व वडील मोलमजुरी करतात. सकाळी दोघेही कामावर गेले तेव्हा मुलगी घरी होती. घरी तिच्यासोबत आजी आणि तिची मोठी बहीणही घरी होती. दरम्यान ती बहिणीसोबत शौचालयास गेली होती.  परंतु ती घरी परतल्यानंतर चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तिची प्रकृती जास्तच बिघडल्याने तिला श्रीरामपूर येथील साखर रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तिला डॉक्टरांनी तपासताच मृत घोषित केले.

 

मुलीवर झाला अत्याचार.. डॉक्टरांचा अंदाज

मुलीवर अत्याचार झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. शवविच्छेदनासाठी मुलीचा मृतदेह औरंगाबाद किंवा प्रवरा रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अहवाल समोर आल्यानंतर सगळा प्रकार समोर येईल, असेही डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, मुलीचा मृतदेह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...