आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्णीत अल्पवयीन विद्यार्थिनीला दिले नशेचे चॉकलेट.. नंतर चौघांनी तिच्यावर केला सामूहिक बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्णी- आठवीच्या विद्यार्थिनीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधमांनी संगनमताने पीडितेला नशेचे चॉकलेट दिले होते. नंतर नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून दोन अद्याप फरार आहेत.

 

या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी आर्णी शहर कडकडीत बंद पाळण्यात आला. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून टायर जाळले. रास्तारोको केला. शहरातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते.

 

दरम्यान आरोपींना त्वरीत अटक करून जलदगती न्यायालयात प्रकरण चालवावे, अशा मागणीचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले. यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरित तीन ते चार आरोपी फरार आहे. सकाळच्या सुमारास शहरात मोर्चेकरांनी यवतमाळ मर्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. त्या दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते.

 

शहरातील एका नामांकित शाळेतील आठव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला तिच्याच वर्गातील मुलाच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओडण्यात आले. त्यानंतर अल्पवयीन मुलीसोबत लगट करून तिला चाकूचा धाक दाखवून नशेच्या गोळ्या दिल्या. तिच्यावर मुख्य आरोपीसह त्याच्या चार ते पाच मित्रांनी आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून अश्लील चित्रफिती काढण्यात आली.

 

प्रकार कुणाला सांगितल्यास तुझ्या वडील आणि भावाला खोट्या गुन्हात आडकविण्याची धमकी आरोपीकडून देण्यात येत होती. नंतर त्या अल्पवयीन मुलीला धमकावत सातत्याने पाशवी अत्याचार करण्यात आले. या प्रकाराने पीडीत मुलगी नैराश्यात गेली होती. परंतु हा प्रकार तिने तिच्या कुटूंबियांना सांगितला नाही. अशात प्रकृती बिघडल्याने तिला कुटुंबियांनी पुणे येथील नातेवाईंकाकडे पाठवले होते. काही दिवसा नंतर त्या पीडीत मुलीने घडलेला सर्व प्रकार तिच्या कुटूंबियांना सांगितला. या नंतर तिच्या कुटुंबियांनी थेट पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारी वरून पोलीसांनी मुख्य आरोपीसह इतर चार ते पाच जणा विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंद केला.

 

या घटनेच्या निषेधार्ह रोजी आर्णीकरांनी बंद पुकारला होता. शहरातील सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवून घडलेल्या घटनेचा निषेध केला. नंतर दुपारी दरम्यान शिष्ठ मंडळाने याबाबत निवेदन दिले. यातील सर्व आरोपींना ताबडतोब अटक करून प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
 

नशेच्या चॉकलेटचा शोध घेणे आव्हानात्मक..

पीडीतेला आरोपींनी नशेचे चॉकलेट दिले होते. चॉकलेट खाल्ल्यानंतर तिला गुंगी आली. नंतर नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. अशा घटनेच नशेचे चॉकलेट वापरण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे. नशेच्या चॉकलेटचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

 

दोघे अद्याप फरार

या घटनेची चार दिवसांपूर्वी पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली होती. तेव्हाच मुख्य आरोपीसह एकाला ताब्यात घेतले होते. उर्वरित दोघे अद्याप फरार आहेत. त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी बुधवारी रात्री विविध संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी पोलिस स्टेशन गाठले होते. त्यानंतर आरोपाला अटकेची मागणी करण्यात आली. वाद पहाटे चार वाजेपर्यंत सुरूच होता.


महिलांनी काढला मूक मोर्चा...

शहरातील एका पीडीतेवर झालेला लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ हजारो महिला रस्त्यावर उतरल्या. सायंकाळी पाच वाजेदरम्यान शिवनेरी चौक ते पोलिस स्टेशनपर्यंत मूकमोर्चा काढून घटनेचा निषेध केला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...