आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gangrape Case Of Tribal Woman In West Bengal, Jalpaiguri Police Files Chargesheet

आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार..नराधमांनी गुप्तांगात खुपसला लोखंडी रॉड, 3 अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलपाईगुडी- पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील एका आदिवासी महिलेवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. बलात्कार करून नराधम थांबले नाहीत तर त्यांनी पीडित महिलेच्या गुप्तांगात लोखंडी रॉड खुपसला. पोलिसांनी याप्रकरणी तीन नराधमांना अटक केली असून एक जण फरार आहे. 35 वर्षीय महिलेवर 20 ऑक्टोबरला सामूहिक बलात्कार झाला होता.पीडितेवर जलपाईगुडी येथील खासगी हॉस्पिटलमधील आयसीयू विभागात उपचार सुरु आहेत.

 

पोलिस सुत्रांनी सांगितले की, घटनेनंतर तिन्ही नराधमांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल करण्‍यात आले आहे. एक आरोपी फरार असून त्याचा पोलिस शोध घेत आहे. 20 ऑक्टोबरला जलपाईगुडीमधील निरंजन पाट भागात घडली. प्रमुख आरोपी हा पीडितेचा नातेवाईक आहे. जमिनीचा वाद मिटविण्याच्या बहाण्याने नराधमांनी महिलेला बोलवून तिच्यावर अत्याचार केला होता.

बातम्या आणखी आहेत...