Home | Maharashtra | Mumbai | Gauri Lankesh Murder Case Sagar Lakhes Connection With Shivpratishthan Sambhaji bhide

गौरी लंकेश हत्या प्रकरण: सागर लाखे हा शिवप्रतिष्ठानचा कट्टर कार्यकर्ता? FB वर भिडे गुरुजींसोबत अनेक फोटो

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 31, 2018, 07:01 AM IST

सागर सुंदर लाखे (30) हा शिवप्रतिष्ठानचा कट्टर कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

 • Gauri Lankesh Murder Case Sagar Lakhes Connection With Shivpratishthan Sambhaji bhide

  बेळगाव- कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाने (एसआयटी) गुरुवारी बेळगावमधून एकाला अटक केली. सागर लाले असे या संशयित आरोपीचे नाव असून या प्रकरणातील आरोपी परशुराम वाघमारेला आश्रय दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.


  गेल्या सप्टेंबरमध्ये गौरी यांची बंगळुरू येथे त्यांच्या निवासस्थानी हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी परशुराम वाघमारे याला अटक केली. यासोबतच गौरी लंकेश यांच्या हत्येचे धागेदोरे तपासण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांत सुरू असलेल्या तपासातील माहितीचाही आधार घेतला जात होता.


  अणदुरेच्या कोठडीत वाढ
  पुणे : डाॅ. दाभाेलकर हत्या प्रकरणात अाैरंगाबाद येथून अटक करण्यात अालेल्या सचिन अणदुरे यास गुरुवारी सीबीअायने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. कोर्टाने त्याच्या पाेलिस काेठडीत १ सप्टेंबरपर्यंत वाढ केली.

  कोण आहे सागर लाखे?

  सागर सुंदर लाखे (30) हा शिवप्रतिष्ठानचा कट्टर कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सागर लाखेच्या फेसबुक वॉलवर भिडे गुरुजींसोबतचे त्याचे खूप फोटो आहेत. त्याचा एक व्हिडिओदेखील आहे. तो फुलांची नर्सरी चालवतो. तो बेंकनहळ्ळी ग्रामपंचायतीचा माजी सदस्य आहे. तो कराटे चॅम्पियन आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येत सागर याचाही सहभाग होता. त्याने व्हॅन चालकाची भूमिका पार पाडली होती. विशेष म्हणजे गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर भरत कुरणेच्या फार्म हाऊसवर झालेल्या पार्टीतही तो सहभागी झाला होता, अशी माहिती कर्नाटक एसआयटीला मिळाली आहे.

  सागर लाखेच्या फेसबुक वॉलवर भिडे गुरुजींसोबत अनेक फोटो
  सागर लाखेच्या फेसबुक वॉलवर भिडे गुरुजींसोबतचे त्याचे अनेक फोटो आहेत. त्याचा एक व्हिडिओही आहे. त्यावरून लाखे हा शिवप्रतिष्ठानचा कट्टर कार्यकर्ता असल्याचा अंदाज एसआयटीने वर्तवला आहे.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा..सागर लाखेच्या फेसबुक वॉलवर भिडे गुरुजींसोबत अनेक फोटो

 • Gauri Lankesh Murder Case Sagar Lakhes Connection With Shivpratishthan Sambhaji bhide
 • Gauri Lankesh Murder Case Sagar Lakhes Connection With Shivpratishthan Sambhaji bhide

Trending